शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
2
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
3
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
4
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
5
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
6
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
7
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
8
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
9
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
10
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
11
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
12
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
13
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
14
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
15
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
16
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
17
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
18
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
19
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
20
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांना आदिवासी आरक्षण संपवायचे होते-मधुकर पिचड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 13:13 IST

स्वत: च्या मंत्रीपदाचा त्याग केला परंतु आदिवासींचे आरक्षण शाबूत ठेवले. काही तालुक्यातील विघ्नसंतोषी माझा खोटा दाखला घेऊन कोर्टात गेले. माझ्याविरोधात निकाल लागला असता तर माझ्यासह राज्यातील  सर्व आदिवासींचे आरक्षण संपले असते, अशी टीका माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केली. सातेवाडी  (पळसुंदे) येथील गाव भेटी दरम्यान त्यांनी ही टीका केली. 

कोतूळ : स्वत: च्या मंत्रीपदाचा त्याग केला परंतु आदिवासींचे आरक्षण शाबूत ठेवले. काही तालुक्यातील विघ्नसंतोषी माझा खोटा दाखला घेऊन कोर्टात गेले. माझ्याविरोधात निकाल लागला असता तर माझ्यासह राज्यातील  सर्व आदिवासींचे आरक्षण संपले असते, अशी टीका माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केली. सातेवाडी  (पळसुंदे) येथील गाव भेटी दरम्यान त्यांनी ही टीका केली. पिचड म्हणाले, जातीचे  दाखले खोट्या आदिवासींना देऊन आरक्षण संपवणाºयांनी आदिवासींच्या नावावर मते मागू नयेत. वेळ प्रसंगी विधानसभेत अजित  पवारांच्या विरोधात गेलो. राष्ट्रपती, राज्यपालांची भेट घेतली. राज्यातील आदिवासी तरुणांना एकत्र करून नाशिकला रेल रोको आंदोलन केले. पेसा कायदा केला. उच्च दर्जाच्या आश्रमशाळा काढल्या. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण, पळसुंदे, येसरठाव, मुळेत पाच धरणे, अकोल्यातील अगस्ती, दूध संघ, फोपसंडी, बिताका, कोंभाळणे-ओतूर रस्ता, वाडी वस्तीवर वीज असे प्रकल्प तालुक्यात आणले. पाच वर्षे तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता. एखाद्या रस्त्याचा खड्डा बुजवला का ? सातेवाडी गटातील पळसुंदे, कोहणे, साकीरवाडी, खडकी येथे भाजप उमेदवार वैभव पिचड यांच्या प्रचारासाठी गाव बैठका घेण्यात आल्या. पांडुरंग कचरे, जुन्नर बाजार समितीचे संचालक देवराम मुंढे, काशिनाथ साबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास गायकर, पांडुरंग कचरे, किसन शिरसाठ, सुभाष वायळ, चंद्रकांत गोंदके, चिमाजी ऊंबरे, दत्तू मुठे आदी उपस्थित होते. 

आम्ही पिचडांबरोबर - रंजना मेंगाळ  आमदार वैभव पिचड यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही अकोले पंचायत समितीच्या सभापती रंजना मेंगाळ यांनी राजूर येथे प्रचारसभेत दिली. याबरोबरच पंचायत समितीचे अकरा सदस्यही त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. अकोले येथील भाजपच्या  संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सभापती मेंगाळ  बोलत होत्या. यावेळी  पंचायत समिती सदस्य दत्तात्रय बो-हाडे, गोरख पथवे, सारिका कडाळे, नामदेव आंबरे, दत्तात्रय देशमुख,  देवराम सामेरे ,  सीताबाई गोंदके, ऊर्मिला राऊत, अलका अवसरकर, माधवी जगधने उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019