शहरं
Join us  
Trending Stories
1
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
2
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
3
IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला
4
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
5
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
6
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
7
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
8
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
9
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
10
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
11
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
12
'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
13
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
14
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
15
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
16
Travel : लग्नानंतर मालदीवला फिरायला जायचा प्लॅन करताय? राहणं, खाणं आणि फिरण्यासाठी किती खर्च येईल?
17
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
18
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा
19
Zepto IPO ला मिळाला हिरवा झेंडा; शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर कंपनी तयार, केव्हा होणार लिस्टिंग?
20
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरण उरले केवळ पिण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 14:11 IST

मुळा धरणाचे पाणी शेतीसाठी मिळत नसल्याची ओरड करीत मुळा डाव्या कालव्याखालील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला़

भाऊसाहेब येवलेराहुरी : मुळा धरणाचे पाणी शेतीसाठी मिळत नसल्याची ओरड करीत मुळा डाव्या कालव्याखालील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला़ खरं म्हटलं तर मुळा धरणाची उभारणी शेतीसाठीच झालेली आहे़ काळाच्या ओघात शेतीसाठी बांधलेले मुळा धरण पिण्यासाठी व उद्योगासाठी उरले़ शेतीच्या पाण्याची कपात होत असल्याची जाणीव उशिराने शेतकऱ्यांना झाली आहे़मुळा धरणाचा उजवा कालवा निघाला़ डावा कालवा निघावा म्हणून डॉ़ बाबूराव दादा तनपुरे, का़ ल़ पवार, केशवराव हारदे आदींचे प्रयत्न सर्वश्रुत आहेत़ बी़ जे़ खताळ यांचे योगदानही पाटबंधारे खात्याचे मंत्री असताना महत्वाचे ठरले़ डावा कालवा निघाला नसता तर राहुरीचा उत्तर भाग उजाड राहिला असता़ डाव कालवा सुरू झाला़ लाभक्षेत्र सुजलाम सुफलाम झाले़ दोन्ही कालव्याचे पाणी ब्लॉकने घेण्याऐवजी शेतकºयांनी ब्लॅकने घेतले़ तत्कालीन आमदार प्रसाद तनपुरे यांनी ७ नंबरचा फॉर्म भरावा म्हणून शेतकºयांना अनेकदा विनवणी केली़ मात्र शेतकºयांनी त्याकडे दुर्लक्षकेले़ कागदोपत्री शेतीसाठीमुळा धरणातील पाण्याला मागणी नव्हती़२००५ मध्ये समन्याय पाणी वाटप झाले़ मध्यरात्री २ वाजता तत्कालीन लोकप्रतिनिधींनी सह्या केल्या़ मुळा धरणाच्या पाण्यात जायकवाडी वाटेकरी ठरला़ खरे तर सह्या करणाºया जिल्ह्यातील आमदारांना शेतकºयांनी जाब विचारायला हवा होता़ मात्र तसे धाडस कुणीही केले नाही़ जायकवाडीला जाणाºया पाण्यालाच शेतकºयांचा विरोध आहे़ मुळाचे पाणी बीडसह अनेक शहरांना भविष्यकाळात जाणार आहे़ त्यामुळे मुळा धरण भविष्यात केवळ पिण्यासाठी उरणार आहे़ भविष्यात थेंबभरही पाणी शेतीसाठी न मिळाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही़ त्यामुळे मुळाच्या दोन्ही कालव्याखालील क्षेत्र ओसाड पडण्याची भीती आहे़शेकडो वर्षात मुळा नदीच्या काठावरील शेती कधी नव्हे एवढी यंदा संकटात सापडली़ उसाचा पट्टा जिरायती होण्याच्या मार्गावर आहे़ बारामाही वाहणारी मुळा ओस पडली आहे़मुळा धरणाच्या पाण्यावरून भविष्यकाळात संघर्ष वाढण्याची भीती आहे़ त्यासाठी डाव्या कालव्याबरोबरच उजव्या कालव्याचे शेतकरीही संघर्षाच्या पावित्र्यात आहेत़ आगामी विधानसभा निवडणुकीतही पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत़तर हुलगे पेरण्याची वेळ येईलएकेकाळी नगर जिल्ह्याचे सरकारमध्ये वजन होते़ अलीकडील काळात मात्र जिल्ह्यातील नेत्यांची ताकद क्षीण झाली आहे़ जिल्ह्याचे पाणी बाहेर जात असताना पक्ष बाजूला ठेवून नेत्यांनी शासनावर दबाव आणण्याची गरज आहे़ अन्यथा उसाच्या पट्ट्यात हुलगे पेरण्याची वेळ शेतकºयांवर येण्याचे दिवस लांब नाहीत़ जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणात पाण्याची आवक सुरू नाही़ पिण्यासाठी केवळ २२५ दलघफू पाणी शिल्लक आहे़ उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले असून पाण्यासाठी एकीची गरज आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर