शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

नवीन लोकप्रतिनिधींसाठी फक्त २0 टक्केच निधी

By admin | Updated: November 18, 2014 15:02 IST

विकासाचे स्वप्न दाखवत भाजपाने नगर जिल्ह्यात प्रथमच कमळ फुलविले. भाजपाचे लोकप्रतिनिधी जिल्ह्यात बदल घडविण्याची हमी देऊ लागले असून, विकास कामांच्या याद्या तयार करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे.

अहमदनगर: विकासाचे स्वप्न दाखवत भाजपाने नगर जिल्ह्यात प्रथमच कमळ फुलविले. भाजपाचे लोकप्रतिनिधी जिल्ह्यात बदल घडविण्याची हमी देऊ लागले असून, विकास कामांच्या याद्या तयार करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. मात्र जिल्हा नियोजनकडे अवघा २0 टक्के निधी शिल्लक आहे. त्यामुळे नवीन आमदारांना विकास कामांसाठी आणखी सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राज्य शासनातर्फे विविध योजना राबविल्या जातात. राज्य शासन, जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत, असा या योजनांचा प्रवास असतो. आघाडी सरकारने ग्रामीण विकासासाठी तब्बल १६६ जिल्हास्तरीय योजना मंजूर केल्या. त्यासाठी शासनाने चालू आर्थिक वर्षात नगर जिल्ह्यासाठी १६८ कोटींचा निधी मंजूर केला. त्यापैकी मे अखेर १२२ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला. वितरीत झालेल्या निधीपैकी गेल्या सात महिन्यांत ९८ कोटी ८0 लाखांचा निधी खर्च झाला आहे. याचाच अर्थ पुढील पाच महिन्यांसाठी अवघा २0 टक्केच निधी शिल्लक राहिला आहे. उपलब्ध निधीतून जिल्ह्याचे विकासाचे नियोजन करावे लागेल. त्यासाठी निधी अपुरा पडणार असून, नवीन पालकमंत्र्यांची निवड होईल. परंतु निधीअभावी त्यांना महत्वाचे निर्णय घेणे शक्य होणार नसल्याचे यावरून दिसते.
राज्यात सरकार स्थापन झाले असले तरी नगर जिल्ह्याच्या पालकमंत्री निवडीला अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. पालकमंत्री निवड होईल, असे गृहीत धरून नियोजनाच्या निधीचा आढावा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी घेतला. त्यामध्ये जिल्हा नियोजनकडे २0 टक्के निधी शिल्लक असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रथमच निवडून आलेल्या आमदारांना नियोजनमधून अत्यंत कमी निधी मिळणार आहे. नियोजन समितीतून अधिकाधिक निधी आघाडीच्या नेत्यांनी खर्च केला. त्यामुळे निवडणूक काळात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता कशी करायची, असा प्रश्न नवीन सदस्यांना भेडसावणार आहे. (प्रतिनिधी)
 
■ कृषी, वन, सहकार, ग्रामविकास,जलसंधारण, जलसंपदा, ऊर्जा, उद्योग, वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम, गृह, पर्यटन, सांस्कृतिक आदी विभागाच्या योजना आहेत.
विकास कामांवर र्मयादा
■ नियोजनचा मोठा खर्च झाला आहे. त्यामुळे पाच महिन्यांत विकास कामे करण्यावर र्मयादा येणार आहेत. निधी अपुरा असल्याने मतदारसंघातील विकास कामे होणार नसल्याचे दिसते.
कुणाला बसणार फटका
■ शेवगाव- आ. मोनिका राजळे, नेवासा- आ. बाळासाहेब मुरकुटे, कोपरगाव-आ. स्नेहलता कोल्हे, श्रीगोंदा- आ. राहुल जगताप आणि नगर शहर- आ. संग्राम जगताप.