शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे भाव कोसळले; घोडेगावला शेतक-यांचा रास्ता रोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 16:31 IST

६० रुपये किलोचा भाव असलेल्या कांद्याचे भाव ३८ ते ४२ रुपयांपर्यंत अचानक गडगडले. यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतक-यांनी घोडेगाव येथे शनिवारी दुपारी बारा ते एक वाजेदरम्यान  लिलाव बंद पाडला. यावेळी नगर-औरंगाबाद रस्त्यावर शेतक-यांनी बैठक मारुन एक तास रास्ता रोको आंदोलन केले. 

घोडेगाव : ६० रुपये किलोचा भाव असलेल्या कांद्याचे भाव ३८ ते ४२ रुपयांपर्यंत अचानक गडगडले. यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतक-यांनी घोडेगाव येथे शनिवारी दुपारी बारा ते एक वाजेदरम्यान  लिलाव बंद पाडला. यावेळी नगर-औरंगाबाद रस्त्यावर शेतक-यांनी बैठक मारुन एक तास रास्ता रोको आंदोलन केले.  कांद्याला भाव वाढवून द्या, शेतक-यांची अडवणूक करु नका. असे म्हणत शेतकरी रस्त्यावर  आले. शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जगन्नाथ कोरडे कार्यालयात ठाण मांडून बसले होते. महाराष्ट्रातील अनेक बाजार समितीत सध्या कांद्याला चांगला बाजार मिळत आहे. आॅनलाईन भाव दिसत असताना घोडेगाव बाजारात भाव का पडतात? शेतकरी आपलाच आहे. त्यांच्यामुळेच बाजार समिती, व्यापारी, आडते आहेत. जाणून भाव पाडू नका, बाजारचे नाव खराब करु नका. चांगल्या मालाला किमान बोली चार हजार क्विंटलपासून सुरु करा, असे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जगन्नाथ कोरडे यांनी ठणकावून सांगितले.यावेळी नेवासा बाजार समितीचे संचालक बाळासाहेब उंडे, चंद्रकांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक जनार्दन सोनवणे, आडतदार सुदाम तागड, राजेंद्र ब-हाटे, संतोष सोनवणे यांनी शेतक-यांशी चर्चा करुन योग्य तो भाव देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कांद्याचे आॅनलाईन भाव पाहून साडेतीन हजार रुपये बोलीच्या अटींवर लिलाव सुरू झाले. त्यानंतर शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले. या रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. दोनशे ट्रक कांद्याची आवकघोडेगाव उप बाजार समितीचे शाखाधिकारी एस.एम.भवार यांनी आडतदारांनी भाव वाढवून उच्चतम भाव द्यावा यासाठी चांगली ठोस भूमिका घेतली. आडतदारांनी त्यांना प्रतिसाद दिला. यामुळे समितीत कांदा लिलाव पुन्हा सुरु झाले.  शनिवारी किमान दोनशे ट्रक कांद्याची आवक झाली होती, असे भवार यांनी सांगितले. 

टॅग्स :onionकांदाAhmednagarअहमदनगर