यंदा कांदा उत्पादनात २५ ते ३० टक्के घट होणार असून शेतकऱ्यांचा कांदा साठवणीकडे कल वाढला आहे.
हक्काचे पीक म्हणून दरवर्षी शेतकरी कांदा पीक घेतले जाते. कांद्याचे एकरी आठ ते दहा टन उत्पन्न निघत आहे. गेल्या वर्षी १३ टन कांद्याचे उत्पन्न झाले होते. यंदा मात्र उत्पादनात घट झाली आहे.
सध्या कांद्याला मार्केटमध्ये ७०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.
मध्यंतरी झालेल्या गारपिटीमुळे कांदा उत्पादकांना कांदा विकावा लागत आहे. ज्या ठिकाणी गारपिटीचा फटका बसला नाही. त्या ठिकाणच्या कांद्याला भुसारात भरण्याचा वेग आला आहे. यंदा साठवून ठेवलेल्या कांद्याला जुलै-ऑगस्टमध्ये भाव मिळण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी भुसार यामध्ये कांदा साठवून ठेवत आहेत.
यंदा कांद्याच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना जास्त भाव मिळण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी एकरी ६० हजार रुपये कांदा उत्पादनासाठी खर्च केला आहे. सध्या आठ ते नऊ हजार रुपये एकर याप्रमाणे कांद्याची काढणी चालू आहे. सध्या मजुरांची टंचाई जाणवत नाही.
.......
यंदा कांद्याच्या उत्पादनात ३० टक्के घट झाली आहे. चार महिन्याने निघणारा कांदा यावर्षी अवघ्या अडीच ते तीन महिन्यातच निघत आहे. पावसामुळे कांदा लवकर काढला जात आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. साठवून ठेवलेल्या कांद्याला चांगल्या प्रमाणात भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
- राधेशाम लहारे,
कांदा उत्पादक, शेतकरी वळण पिंपरी
..........
फोटो - राहुरी
कॅप्शन : कांदा निवडताना शेतकरी व शेतमजूर मास्कचा वापर करून कोरोना काळजी घेत आहे.