शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

नाट्यगृह पूर्ण करण्यास एक वर्षाचा अल्टिमेटम : महापौरांनी केली ठेकेदाराची कानउघडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 17:10 IST

महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रोफेसर कॉलनी चौकात उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक व भव्य नाट्यगृहाच्या कामास महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालन ढोणे यांनी आज सकाळी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली.

अहमदनगर : महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रोफेसर कॉलनी चौकात उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक व भव्य नाट्यगृहाच्या कामास महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालन ढोणे यांनी आज सकाळी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली. धीम्या गतीने होत असलेल्या कामाबद्दल यावेळी महापौर उपमहापौर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी ठेकेदार रसिक कोठारी यांची चांगलीच कानउघडणी केली. एक वर्षाच्या आत नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्याचा अल्टीनेटम यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिला. मार्चएन्ड पर्यंत आरसीसी बांधकाम पूर्ण झाले पाहिजे अशी सूचना उपमहापौर मालन ढोणे यांनी दिली.यावेळी नगरसेवक मनोज दुल्लम, नगरसेविका आशा कराळे, शहर अभियंता विलास सोनटक्के, उपअभियंता मनोज पारखे, श्रीकांत निंबाळकर, भाजपचे सतीश शिंदे, शिवाजी कराळे, पुष्कर कुलकर्णी, उदय कराळे, किशोर कानाडे, ठेकेदार रसिक कोठारी, आर्किटेक नेहा शिंदे आदी उपस्थित होते.वाकळे म्हणाले, नगर शहराला शहरपण येण्यासाठी मोठ्या विकास कामांची गरज आहे. तेवढेच शहराच्या वैभवात भर घालणा-या या नाट्यगृहाचे काम त्वरित पूर्ण करणेही गरजेचे आहे. शहरातील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी नाट्यगृहाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षापासून या नाट्यगृहाचे काम संथ गतीने चालू आहे. यापुढे आता काम न थांबवता एक वर्षाच्या आत या नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले पाहिजे. यासाठी पैशाची कमतरता पडणार नाही. राज्य सरकारकडून वेळोवेळी निधी उपलब्ध करुन देऊ. नवीन बांधकामास अडथळा येत असलेल्या जुन्या स्पर्धा परीक्षा केंद्राची इमारत पाडून तेथे तातडीने काम सुरू करण्याचे आदेश देत आहे. तसेच दर आठ दिवसांनी या कामाची पाहणी करून प्रगतीचा आढावा घेणार आहोत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका