अहमदनगर : रस्त्यातून बाजूला काढण्याचा राग आल्याने एकास चावा घेणाऱ्या बाळासाहेब रंगनाथ गोरे (रा. रुईछत्तीसी, ता. नगर) याला जिल्हा न्यायाधीश ए.व्ही. कुलकर्णी यांनी एक वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावात बाळासाहेब गोरे हा २१ जुलै २००९ रोजी दारु पिऊन रस्त्याच्यामध्ये आला होता. राजेंद्र रामदास भापकर यांनी त्याला रस्त्याच्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने तो भापकर यांच्या डाव्या खांद्याजवळ चावला. या प्रकरणी भापकर यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात गोरे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर हेड कॉन्स्टेबल खैरे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकारी पक्षातर्फे अॅड. नितीन वाघ यांनी सहा साक्षीदार तपासले.
चावा घेतल्याने एक वर्षाची सक्तमजुरी
By admin | Updated: July 26, 2014 00:33 IST