शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

टाकळी ढोकेश्वर येथील अपघातात एक ठार; अ‍ॅम्बुलन्समध्ये मृतदेह ठेवून ग्रामस्थांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 12:57 IST

नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित टोलनाक्याजवळ तिखोल फाटा येथे बुधवारी रात्री मालट्रक व पिकअपची समोरासमोर धडक झाली. यात तिखोल येथील एका तरुणाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देनगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित टोलनाक्याजवळ तिखोल फाटा येथे बुधवारी रात्री मालट्रक व पिकअपची समोरासमोर धडक झाली. यात तिखोल येथील एका तरुणाचा मृत्यू झाला.या अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी तिखोल ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी अपघातस्थळी मयत युवकाचा मृतदेह अ‍ॅम्बुलन्समध्ये ठेवून रास्त रोको आंदोलन केले.मालट्रक व पिकअपचा अपघात इतका भयावह होता की या अपघातात पिकअपचा चक्काचूर झाला.

टाकळी ढोकेश्वर : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित टोलनाक्याजवळ तिखोल फाटा येथे बुधवारी रात्री मालट्रक व पिकअपची समोरासमोर धडक झाली. यात तिखोल येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी तिखोल ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी अपघातस्थळी मयत युवकाचा मृतदेह अ‍ॅम्बुलन्समध्ये ठेवून रास्त रोको आंदोलन केले.अंकुश भागाजी ठाणगे (वय २८, रा. तिखोल, ता.पारनेर) असे मयताचे नाव आहे. बुधवारी रात्री अपघात झाल्यानंतर ठाणगे यास उपचारासाठी नगरला नेण्यात आले. दरम्यान येथे डॉक्टरांनी त्याची प्राणज्योत मालविल्याचे सांगितले. सकाळी मृतदेह तिखोल येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येत होता. मात्र, त्याचवेळी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा न नोंदविता दोन्ही वाहने अपघातस्थळावरुन हटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिखोल ग्रामस्थांनी संबंधित ट्रक चालकावर गुन्हा नोंदविण्याची मागणी करीत अ‍ॅम्बुलन्समधून आणलेला मृतदेह तसाच गाडीत ठेवून रास्ता रोको आंदोलन सुरु केले. गुन्हा दाखल झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, असा इशारा आंदोलकांनी पोलिसांना दिला. सुमारे एक तास हे आंदोलन चालले. त्यामुळे वाहनांच्या सुमारे एक किलोमीटर रांगा लागल्या होत्या.पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे व पोलीस कॉन्स्टेबल आबा ढोले हे घटनास्थळी दाखल झाले. गुन्हा नोंदवून त्याची प्रत मृताच्या नातेवाईकांच्या हातात लगेच दिली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

अपघातात पिकअपचा चक्काचूर

मालट्रक व पिकअपचा अपघात इतका भयावह होता की या अपघातात पिकअपचा चक्काचूर झाला. या अपघातातील मालट्रक (क्रमांक एम. एच. १४ बी़जे़ ११७६) नगरकडून कल्याणच्या दिशेने तर पिकअप (क्रमांक एम.एच.१६ ए वाय ३०९०) तिखोल गावाकडे चालली होती. तिखोल फाट्यावर असणा-या वळणावर हा समारोसमोर अपघात झाला. या महामार्गावर काम चालू असल्याने रस्ता अरूंद बनला आहे. त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जाते.

मृत्यूच्या दाढेतून वाचले तिघे

चक्काचूर झालेल्या पिकअपमध्ये अंकुश ठाणगेसह तिखोल येथील इतर तीन तरूणही होते. परंतु या तिघांना अपघात स्थळापासून ५०० मीटर अंतरावर सोडून ठाणगे तिखोलकडे परतत असताना हा अपघात झाला. त्यामुळे या अपघातातून तिघेही बचावले असल्याची चर्चा आहे. तर अपघातातील मयत तरुणाला पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.

महामार्गाच्या कामाने घेतला बळी

नगर-कल्याण महामार्गाच्या रस्ता रुंदीकरण व प्रस्तावित टोलनाक्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महामार्गाच्या सथ कामानेच तिघोलच्या तरुणाचा बळी घेतला अशी चर्चा रास्ता रोको दरम्यान आंदोलकांमध्ये रंगली होती. या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरAccidentअपघात