शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल अपघातात शिक्षकासह दोन जखमी; जामखेड तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 13:39 IST

दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अकोले तालुक्यातील एका शिक्षकासह त्याच्या भाऊ जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजता जामखेड तालुक्यातील रत्नापूर फाटा येथे घडली. 

जामखेड : दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अकोले तालुक्यातील एका शिक्षकासह त्याच्या भाऊ जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजता जामखेड तालुक्यातील रत्नापूर फाटा येथे घडली.  रामदास मारुती पिचड (वय ४४ रा. अकोला जि. अहमदनगर) हे तालुक्यातील दिघोळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबई व पुणे येथून लोक गावी येत असल्याने त्यांना शाळेत क्वारंटाईन केले जात आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक गावात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची नियुक्ती केली आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शिक्षक रामदास पिचड गावी अकोले येथे होते. क्वारंटाईन झालेल्या शाळेत रामदास पिचड यांची ड्युटी लागल्यामुळे ते सख्खा भाऊ भरत पांडुरंग पिचड (वय ४७, रा.अकोला, जि.अहमदनगर) यास अकोला येथून मोटरसायकलवरून जामखेड येथे येत होते. यावेळी जामखेड तालुक्यातील रत्नापूर फाट्याजवळ एका मोटरसायकलने समोरासमोर धडक दिली. यामध्ये झालेल्या अपघातात पिचड बंधू जखमी झाले आहेत. जखमींना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यांची प्रकृती सुधारत आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघात