पाचेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या हिवाळी २०२१-२०२२ वर्षातील द्वितीय आणि तृतीय औषधनिर्माणशास्त्र पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील शिवा ट्रस्ट संचालित शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसीचा शंभर टक्के निकाल लागला आहे. यंदाही या महाविद्यालयाने निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षांमध्ये सुप्रिया संजय लवांडे, स्नेहल मल्हारराव देशमुख व विद्या शिवाजी पारधी (९.६७ एसजीपीए) या तिन्ही मुलींनी प्रथम क्रमांक पटकाविला. आदित्य राजेंद्र मुरदारे (९.५० एसजीपीए) यांनी द्वितीय तर दीपिका विकास गवळी व अतुल सुदाम शेवगण(९.४२ एसजीपीए) यांनी अनुक्रमे तृतीय क्रमांक पटकावला आहे.
औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षांमध्ये शीतल राजेंद्र काळे (९.६२ एसजीपीए) हिने प्रथम क्रमांक पटकावला असून ओंकार सुजय तांबवेकर (९.४६ एसजीपीए) यांनी द्वितीय तर पूजा दिलीप खालकर (९.३१ एसजीपीए) हिने तृतीय क्रमांक पटकाविला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार, प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, प्रशासकीय अधिकारी किशोर जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ. दादासाहेब जाधव, बाळासाहेब जाधव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.