शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

टिकटॉकचा व्हिडीओ बनवताना चुकून गोळी लागून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू; दोघांना तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 11:43 IST

व्हिडीओ काढताना गोळी सुटल्यानं एकाचा मृत्यू

शिर्डी : टिकटॉकवर अपलोड करण्यासाठी एकमेकांचा व्हिडीओ काढत असताना गावठी कट्ट्यातून गोळी सुटून छातीत लागल्याने प्रतीक वाडेकर या युवकाचा मंगळवारी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना जेरबंद करण्यात शिर्डी पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून गावठी कट्टादेखील ताब्यात घेण्यात आला आहे.मंगळवारी सायंकाळी हॉटेल पवनधाम येथील रूम नंबर १०४ मध्ये काही मुले फ्रेश होण्यासाठी गेली होती. त्यावेळी गोळी लागून प्रतीक संतोष वाडेकर या युवकाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या सोबत आलेल्या मुलांनी तिथून पळ काढला. गोळीच्या आवाजाने हॉटेलचे मालक गोविंद गरुड सावध झाले. त्यांनी हॉटेल बाहेर पळणाऱ्या एका मुलाला पकडलं. मात्र त्यांना धमकावून तोही पसार झाला. घटनेनंतर काही मिनिटांतच पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक अनिल कटके व सहकारी पोलीस उपनिरीक्षक पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. वाकचौरे यांनी घटनास्थळी प्राथमिक माहिती घेऊन तसंच सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींच्या शोधासाठी तत्काळ तीन पथके रवाना केली.आरोपींचा शोध सुरू असताना पोलीस निरीक्षक कटके यांना सदरचे आरोपी शहरातील रेल्वे स्टेशनलगत लपून बसले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ तेथे जाऊन सनी पोपट पवार (वय २०, रा. धुळदेव, ता.फलटण, जि.सातारा) यास गावठी कट्टा व एका राऊंडसह ताब्यात घेतले. त्याचा सहकारी नितीन अशोक वाडेकर हा सुद्धा काही वेळातच पोलिसांना सापडला. विशेष म्हणजे मयत व आरोपी एकमेकांचे जवळचे नातलग आहेत.सनी पवार याने टिकटॉक व्हिडीओ काढत असताना आपल्याकडून गोळी सुटून प्रतीकचा मृत्यू झाल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. घटनास्थळावरून उडालेल्या राऊंडची पुंगळीही जप्त करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अनिल कटके पुढील तपास करत आहेत.