अहमदनगर: फायनान्स कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगत चार चोरट्यांनी केडगाव बायपास येथून मालकाच्या ताब्यातील पिकअप चोरून नेली़ ४ फेबु्रवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली़याप्रकरणी पिकअपचे मालक शिवाजी पांडुरंग सुळे (रा़ केडगाव चौफुला ता़ दौड जि़ पुणे) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ सुळे हे पिकअप वाहनातून त्यांच्या पत्नीसमवेत नगरमार्गे जळगाव येथे जात होते़ सोमवारी त्यांचे वाहन केडगाव बायपास येथे आले तेव्हा एका कारमधून आलेल्या चौघांनी त्यांना पिकअप बाजूला घेण्यास सांगितले़ आम्ही मंडल फायनान्स कंपनीतून आलो असून तुमच्या गाडीचे हप्ते थकलेले आहेत़ त्यामुळे तत्काळ पैसे भरावे लागतील असे सांगत त्या चार जणांनी सुळे यांची पिकअप चोरून नेली़
अधिकारी असल्याचे सांगत पिकअप चोरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 11:27 IST