शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

विरोधी पक्षनेत्याला अधिकारी जुमानेना

By admin | Updated: May 6, 2016 23:27 IST

अहमदनगर : फेज टू पाणी योजनेच्या नवीन मोटारी बसविल्याने मोठा गाजावाजा करून सत्ताधारी राष्ट्रवादीने शहराचे पाणी वाढल्याचे सांगत श्रेय घेतले.

अहमदनगर : फेज टू पाणी योजनेच्या नवीन मोटारी बसविल्याने मोठा गाजावाजा करून सत्ताधारी राष्ट्रवादीने शहराचे पाणी वाढल्याचे सांगत श्रेय घेतले. शहराचे पाणी खरेच वाढले का, अशी शंका उपस्थित करत सेनेने त्याची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. पाहणीसाठी अधिकारी उपलब्ध व्हावेत, यासाठी महापालिका प्रशासनाला विरोधी पक्षनेत्यांनी पत्र दिले. मात्र, अधिकाऱ्यांनी या पत्राला जुमानले नाही. त्यामुळे सेनेचा ‘मुळा धरणातील पाणी उपसा’ पाहणी दौरा अजूनही निश्चित झालेला नाही. मुळा धरणात दोनशेऐवजी चारशे हॉर्सपॉवरच्या नव्याने दोन मोटारी बसविल्याने शहराचा पाणी पुरवठा वाढल्याचे सांगत महापालिकेतील सत्तापक्ष राष्ट्रवादीने श्रेय घेतले. मात्र, तो केवळ दिखाऊपणा होता. मोटारी नव्याने बसविल्या तरी त्या सुरू झालेल्या नाहीत. पाईपलाईन तीच असल्याने पाणी कसे काय वाढेल? असे प्रश्न उपस्थित करून सेनेच्या नगरसेवकांनी सत्तापक्षाचे श्रेय घेण्याची पोलखोल करण्याचे ठरविले. त्यानुसार सेनेचे सर्व नगरसेवक ‘मुळा धरणातील पाणी उपसा केंद्राला’ भेट देण्यासाठी जाण्याचे निश्चित झाले. तांत्रिक माहितीसाठी अधिकाऱ्यांना सोबत घेण्याचा निर्णय झाला. अधिकारी उपलब्ध व्हावेत, यासाठी सेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय शेंडगे यांनी प्रशासनाला तसे पत्र दिले. मात्र, अधिकारी उपलब्ध झाले नाहीत. अधिकारी नसल्याने दोन वेळेस हा पाहणी दौरा रद्द करावा लागला. विरोधी पक्ष नेत्यांच्या पत्राला प्रशासनाने जुमानले नाही, हेच यावरून स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)विरोधी पक्षाची कणखर भूमिका नाहीमहापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका कणखर नसल्यानेच प्रशासन त्यांना जुमानत नसल्याचे दिसते. किंबहुना सत्तापक्षाच्या दबावामुळे अधिकारी आले नसावेत, अशी शंका उपस्थित केली जात आहे. संजय शेंडगे यांनी महासभेत म्हणाले, अन्य प्रश्नावर सत्तापक्षाला कोंडीत पकडून नाकी दम आणला, असे कधी झाल्याचे दिसले नाही. विरोध म्हणून फक्त पत्र देण्याचे काम त्यांनी आतापर्यंत केले. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याचा प्रशासनावर जो दबदबा असायला हवा, तो निर्माण झाला नाही. त्यामुळेच विरोधी पक्ष नेत्याच्या पत्राला प्रशासनाने जुमानले नसावे, अशी चर्चा आहे. प्रशासनाला पत्र दिले आहे. मात्र, त्यात तारीख लिहिलेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक असल्याने अधिकारी तिकडे गेले होते. नंतर सेना नगरसेवकांच्या जमवाजमवीला उशीर झाला. त्यामुळे पाहणी दौऱ्यास विलंब झाला आहे. - संजय शेंडगे.