शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याविना शिजतोय पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 12:30 IST

राज्य शिक्षण संचालनालयाने भाजीपाला व आहार शिजविण्यासाठी लागणाऱ्या गॅसचे पैसे थकविले आहेत.  त्यामुळे जिल्ह्यातील पाच लाख विद्यार्थ्यांचा पोषण आहार गेल्या सात महिन्यांपासून भाजीपाल्याविना शिजत आहे.

अण्णा नवथरअहमदनगर : राज्य शिक्षण संचालनालयाने भाजीपाला व आहार शिजविण्यासाठी लागणाऱ्या गॅसचे पैसे थकविले आहेत.  त्यामुळे जिल्ह्यातील पाच लाख विद्यार्थ्यांचा पोषण आहार गेल्या सात महिन्यांपासून भाजीपाल्याविना शिजत आहे. आहार शिजविणा-या मदतनीसांनाही पैसे मिळाले नसल्याने त्यांचीही परवड सुरू आहे.गोरगरिबांच्या मुलांना शाळेत पोटभर एकवेळचे जेवण मिळावे, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली़ कोट्यवधी रुपये खर्चून शाळेत आमटी, खिचडी शिजते़ अहमदनगर जिल्ह्यातील साडेचार हजार शाळांतील ५ लाख १७ हजार विद्यार्थ्यांसाठी रोज पोषण आहार शिजविला जातो. त्यासाठी तांदूळ, हरभरा दाळ, मटकींसह मीठ, मसाला हा कोरडा शिधा शासनाकडून मिळतो़ त्यात भाजीपाला घालून शाळेतील स्वयंपाकीण मुलांसाठी आमटी, भात खिचडी, असा पोषण आहार शिजवितात. गेल्या जानेवारीनंतर भाजीपाला व गॅसचे पैसेच शाळांना मिळालेले नाहीत. आॅनलाईन पैसे जमा करायचे आहेत, असे सांगून जिल्हा परिषदांना एप्रिलपासून पैसे देणे बंद केले गेले. त्यानंतर सात महिन्यांत आॅनलाईन पेमेंट किंवा आॅफलाईन या पैकी कोणत्याही पद्धतीने पैसे मिळाले नाहीत. तेंव्हापासून स्वयंपाकिण ताई चुलीवरच जसा मिळेल तसा पोषण आहार मुलांना खाऊ घालते आहे. पण त्यांचेही पैसे शिक्षण मंडळाने सात महिन्यांपासून दिलेले नाही. सहा महिन्यानंतर ११ सप्टेंबर रोजी मुख्याध्यापकांच्या खात्यावर १ रुपया टाकण्याचा प्रयोग शिक्षण संचालनालयाने केला़ परंतु, तोही यशस्वी झाला नाही. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद