शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरीत कामगारांचा आकडा चारशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:06 IST

लॉकडाऊनच्या काळातही पायी गावाकडे निघालेल्या स्थलांतरीत कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, महापालिकेच्या निवारागृहात शुक्रवारी (दि़ २४) नव्याने २४ जण दाखल झाले आहेत

अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळातही पायी गावाकडे निघालेल्या स्थलांतरीत कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, महापालिकेच्या निवारागृहात शुक्रवारी (दि़ २४) नव्याने २४ जण दाखल झाले आहेत. त्यामुळे निवारागृहातील स्थलांतरीत कामगारांची संख्या ४१० झाली आहे़सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अनेक कामगार कामाच्या ठिकाणी अडकून पडले़ गेल्या महिनाभरापासून हे कामगार मिळेल ते खाऊन दिवस काढत आहेत़ मात्र काहीजणांचे कुटुंब गावाकडे असल्याने त्यांना गावाकडची चिंता आहे़ लॉकडाऊनच्या काळातही स्थलांतरीत कामगार वाहने मिळत नसल्याने पायी गावाकडे निघालेले आहेत़ जिल्हाबंदी असल्याने पोलीस स्थलांतरीत कामगारांना पकडून त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात पाठवितात़ रुग्णालयातून त्यांना निवारागृहात पाठविले जाते़ शहर व परिसरातून जाणारे चारशेहून अधिक जणांना पकडून महापालिकेच्या निवारागृहात ठेवण्यात आले आहे़ तिथे त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय करण्यात आली आहे़ दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये ही संख्या अचानक वाढली़ त्यामुळे महापालिका प्रशासनाला येणाऱ्यांची व्यवस्था करताना चांगलीच कसरत करावी लागली़ महापालिकेने मंगल कार्यालये अधिग्रहीत केली असून, त्या ठिकाणी त्यांची सोय करण्यात आली आहे़ मंगल कार्यालये कमी पडल्याने नव्याने बुरुडगाव येथील कार्यालय घेण्यात आला आहे़अन्नछत्रातून १७०० जणांना जेवणमहापालिकेने हातावर पोट असणा-यांसाठी दोन अन्नछत्र सुरू केले आहेत़ तिथेही मागणी वाढू लागली असून, शुक्रवारी दिवसभरात १ हजार ७०० नागरिकांना अन्नाची पाकिटे देण्यात आली आहेत़ याशिवाय सामाजिक संस्थांमार्फत अन्नाचे वाटप सुरू आहे़स्थलांतरीत कामगार येत आहेत़ त्यांची जेवनाची व राहण्याची सोय करण्यात आली आहे़ गुरुवारी नव्याने २४ जण दाखल झाले असून, ही संख्या आता चारशेहून अधिक झाली आहे़ गरज पडल्यास आणखी मंगल कार्यालये ताब्यात घेण्यात येतील. -सुनील पवार, उपायुक्त, महापालिका 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका