अहमदनगर : कोरोनाने रविवारी दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा सातशेपार केला आहे. रविवारी एकाच दिवशी ७५८ बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली असून ती ३ हजार ४४९ इतकी झाली आहे. संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या पुन्हा एकदा शंभरीपार गेली असून नगर शहरातील रुग्णसंख्येतही दुपटीने वाढ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३३८ आणि अँटिजेन चाचणीत ४०२ रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर १, जामखेड ३, नगर ग्रामीण २, पारनेर १, पाथर्डी ७ आणि श्रीगोंदा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर ३८, अकोले १४, जामखेड ४, कर्जत २३, कोपरगाव १३, नगर ग्रामीण १५, नेवासा १३, पारनेर १७, पाथर्डी ६, राहता ११, राहुरी ८, संगमनेर ९७, शेवगाव ३१, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर २६ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत आज ४०२ जण बाधित आढळून आले. नगर शहर ७, अकोले ३२, जामखेड १८, कर्जत ५४, कोपरगाव २२, नगर ग्रामीण ८, नेवासा ३०, पारनेर ६०, पाथर्डी ७३, राहता १४, राहुरी १०, संगमनेर २२, शेवगाव २३, श्रीगोंदा २०, श्रीरामपूर ८ आणि कंटोन्मेंट बोर्ड १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
----------
कोरोनास्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : २,७९,३०४
उपचार सुरू असलेले रुग्ण:३४४९
पोर्टलवरील मृत्यू नोंद :६०४०
एकूण रुग्णसंख्या :२,८८,७९३
----------------
गर्दी आणि लग्नकार्य जोमात
शनिवार, रविवारी वीकेण्ड लॉकडाऊन असला तरी नागरिक निसर्गरम्य ठिकाणी जात आहेत. तसेच लग्नसोहळ्यांना पुन्हा एकदा गर्दी होत आहे. त्याशिवाय सायंकाळी पाचनंतर संचारबंदी असली, तरीही रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर वर्दळ सुरूच असते. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. दरम्यान ग्रामीण भागात रुग्ण का वाढत आहेत, याचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चाचण्याही वाढविण्यात येत आहे.