शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

...आता दोन रुपयात जनावरांची सोनोग्राफी; पशुसंवर्धन विभागाची महत्वाकांक्षी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 18:21 IST

गाय, म्हैस या गाभण आहेत किंवा नाही, याबाबत शेतक-यांची अनेकदा फसवणूक केली जाते़ शेतक-यांची ही फसवणूक टाळण्यासाठी व गाभण जनावरांच्या पोटातील गर्भ नेमका किती दिवसांचा आहे, याची इत्यंभूत तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने लवकरच सोनोग्राफी मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे़.

अहमदनगर : गाय, म्हैस या गाभण आहेत किंवा नाही, याबाबत शेतक-यांची अनेकदा फसवणूक केली जाते़ शेतक-यांची ही फसवणूक टाळण्यासाठी व गाभण जनावरांच्या पोटातील गर्भ नेमका किती दिवसांचा आहे, याची इत्यंभूत तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने लवकरच सोनोग्राफी मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे़. या मशीनद्वारे शेतक-यांना फक्त दोन रुपयांमध्ये जनावरांची सोनोग्राफी करता येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या सभागृहात गुरुवारी (दि़ १२) पशुसंवर्धन विभागाच्यावतीने विषबाधेत मृत झालेल्या जनावरांच्या आर्थिक मदतीचे धनादेश गडाख यांच्या हस्ते पशुपालकांना प्रदान करण्यात आले. यावेळी सदस्य राजेश परजणे, शरद नवले, संध्या आठरे, सोनाली रोहमारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ सुनील तुंबारे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील ज्या शेतक-यांची जनावरे विषबाधेने मृत झाली आहेत, त्या शेतक-यांना आर्थिक मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने १० लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी ८ लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण शेतक-यांना करण्यात आले. सुमारे ८१ शेतक-यांना गुरुवारी दुस-या टप्प्यातील मदतीचे धनादेश सुपुर्द करण्यात आले. यावेळी गडाख म्हणाले, मी देखील शेतकरी आहे. त्यामुळे एक जनावर दगावले तर शेतक-यांचे किती नुकसान होते, हे मला माहिती आहे. त्यामुळे शेतक-यांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेने ही योजना सुरु केली आहे. त्याशिवाय शेतक-यांच्या मागणीप्रमाणे काऊ लिफ्टींग मशिन, दूध काढणी यंत्र, मुरघास पिशव्या, जनावरांसाठी एक्स-रे मशीन या योजना भविष्यात राबविण्यात येणार आहेत. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcowगाय