शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल : मुळा धरणावर शस्त्रधारी पोलीस तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 16:44 IST

‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, मुळा धरणावर आज शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत़ विषारी औषधांद्वारे होणाऱ्या मच्छिमारीला अखेर पूर्णपणे बे्रक बसला आहे़ ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने ४४ कर्मचारी तैनात केले असून, अवैध मच्छिमारीही बंद पडली आहे.

ठळक मुद्देविषारी औषधाने मच्छिमारीला ब्रेकठेकेदाराचे ४४ कर्मचारी संरक्षणासाठी सरसावले

राहुरी : ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, मुळा धरणावर आज शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत़ विषारी औषधांद्वारे होणाऱ्या मच्छिमारीला अखेर पूर्णपणे बे्रक बसला आहे़ ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने ४४ कर्मचारी तैनात केले असून, अवैध मच्छिमारीही बंद पडली आहे.भातामध्ये विषारी औषध टाकून ते धरणाच्या विविध भागांत टाकले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. विषारी भातामुळे अल्पावधीत मासे बळी पडत होते. शॉर्टकट पद्धतीने विषारी प्रयोग करून मुबलक प्रमाणावर मासे सहजगत्या जमा करण्याचे बिंग फुटले. विषारी औषधांचा प्रयोग बंद झाल्याने ग्राहकांना दर्जेदार मासे उपलब्ध होऊ लागले आहेत.मुळा धरणासाठी राहुरी पोलीस स्टेशनकडे पोलीस संरक्षण मागण्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तीन पोलीस उपलब्ध करून दिल्याची माहिती धरण अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली. याशिवाय धरणावर असलेल्या चौकीवरील दोन पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पाटबंधारे खात्याचे कर्मचारी व ठेके दाराचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.रात्रंदिवस मुळा धरण परिसरात सशस्त्र पोलीस पहारा सुरू झाल्याने अवैधरीत्या मच्छिमारीला बे्रक बसला आहे. अवैधरीत्या मच्छिमारी करणा-यांना बंदी घालण्यात आली आहे. ठेकेदाराकडून पाटबंधारे खात्याने सुरक्षा कर्मचा-यांचा बायोडाटा मागविला आहे. याशिवाय ओळखपत्र कुणाला दिले याचीही माहिती मागविली आहे.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर भातामध्ये विष टाकून मच्छिमारी केली जात होती़ अनधिकृतरीत्या केले जाणारे कृत्य बंद पाडण्यात आले आहे. बंदोबस्तासाठी ४४ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्यामुळे मच्छिमारीसाठी विषाचा प्रयोग कुणालाही करून दिला जाणार नाही. आम्ही धरणात मच्छबीज सोडले आहेत. विषारी प्रयोगामुळे लहान मासे मृत्युमुखी पडून नुकसान होते. त्यामुळे जाळे टाकूनच मच्छिमारी केली जाणार आहे. विष कालवून मच्छिमारी करणा-यांची गय केली जाणार नाही. त्यामुळे भविष्यकाळात अपप्रवृती सहन केल्या जाणार नाहीत.  -बिलाल खान, ठेकेदाऱराहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तीन पोलीस उपलब्ध करून दिले आहेत. धरण चौकीवर असलेले दोन पोलीस व पाटबंधारे खात्याचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय ठेकेदाराने सुरक्षा व्यवस्था क डक केली आहे़ कडक पहारा सुरू केल्याने अपप्रवृतीला आळा बसला आहे. - शामराव बुधवंत, धरण अभियंता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीPoliceपोलिस