शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पाणी नाही तर मतही नाही : मतदानावर श्रीरामपुरमधील ग्रामस्थांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 18:33 IST

भंडारदरा धरणाच्या अखेरच्या उन्हाळी आवर्तनातून लाभक्षेत्रातील शेकडो शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. श्रीरामपूर, राहाता व राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी पाटबंधारेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेराव घातला.

श्रीरामपूर : भंडारदरा धरणाच्या अखेरच्या उन्हाळी आवर्तनातून लाभक्षेत्रातील शेकडो शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. श्रीरामपूर, राहाता व राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी पाटबंधारेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेराव घातला. श्रीरामपूर येथील उंबरगाव, माळेवाडी, वळदगावसह काही गावांनी ग्रामसभा घेऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.धरणातून १५ मार्च रोजी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले होते. अखेरच्या आवर्तनातून उसासह चारा पिकांना जीवनदान मिळणार होते. मात्र, श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी, उंदिरगाव, हरेगाव, मुठेवाडगाव, माळवाडगाव, वडाळा महादेव, उंबरगावसह राहुरी तालुक्यातील काही गावांना पाणी मिळू शकले नाही. राहाता तालुक्यातील लोणीसह सोनवगाव परिसरही पाण्यापासून वंचित राहिला. त्यामुळे गुरुवारी पाटबंधारेविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. श्रीरामपूरमध्ये शेकडो शेतकºयांनी पाटबंधारेच्या वडाळा उपविभागीय कार्यालयाला घेरावो घातल. यानंतर संतापलेल्या शेतकºयांनी तहसील कार्यालयात ठिय्या दिला. जमावबंदी आदेश लागू झालेले असल्याने यावेळी पोलिसांचू कूमक बोलविण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे, सभापती सचिन गुजर, शेतकरी संघटनेचे नेते जितेंद्र भोसले, अनिल औताडे, राजेंद्र पाऊलबुद्धे, विश्वनाथ मुठे, दिलीप गलांडे, नानासाहेब पवार, सुनील कुदळे, रघुनाथ उघडे, सोपान औताडे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी देवळालीप्रवरा येथील आंदोलनात सहभाग घेतला.आता भंडारदरा धरणात एक हजार ६०० व निळवंडेत १ हजार १७३ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. त्यातील ४५० एमसीएफटी हा मृतसाठा आहे. २ हजार ३०० दशलक्ष घनफूट पाण्यामध्ये जुलैपर्यंतचे पिण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लाभक्षेत्रातील नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या साठवण तलावाकरिता पाणी शिल्लक ठेवण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश आहेत. प्रत्येकी ७०० एमसीएफटीच्या आवर्तनातून हे तलाव भरले जातील, अशी माहिती देशमुख यांनी दिली.आज सायंकाळी माळेवाडी, उंबरगाव, उंदिरगाव, मुठेवाडगाव येथे ग्रामसभा घेतल्या जाणार आहेत. त्यात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय होणार आहे. नेते मंडळी व उमेदवारांना गावात येण्यास मज्जाव केला जाणार आहे, अशी माहिती सरपंच सोपान औताडे, जितेंद्र भोसले, अनिल औताडे, विश्वनाथ मुठे, राजेंद्र पाऊलबुद्धे आदी नेत्यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९shirdi-pcशिर्डी