राहुरी : देवळाली प्रवरा येथील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी परप्रांतीय दिसताच त्यांना मारहाण केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. तेच शंभर परप्रांतीय सध्या राहुरी येथील आश्रमशाळेत आहेत. आम्हाला जेवण नको, मदतही नको, आम्हाला फक्त आमच्या गावी जाऊ द्या,अशी आर्त हात त्यांनी दिली आहे. लॉकडाऊनमुळे प्रशासनाने मात्र त्यांची राहण्याची व जेवणाचीही व्यवस्था केल आहे.लॉकडाऊनमुळे परराज्यातील नागरिक अडकून पडले आहेत. जो तो आपापल्या पद्धतीने घरी जाण्यासाठी धडपडत आहे. दोन ट्रकमधून शंभर महिला पुरूष आपल्या घरी जात असताना राहुरी तालुक्यातील गुहा येथे काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना जबर मारहाण केली. ही घटना ११ एप्रिलला घडली. २२ मार्चपासुन परप्रांतीय मज्ूर गावाकडे जाण्याच्या धडपडीत आहेत वाहनांचा आधार घेत त्यांनी गावाकडे निघालेले असताना देवळाली प्रवरा येथील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना मारहाण केली होती. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून त्यांच्या राहण्याची व्यवस्था व जेवण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.११ एप्रिल रोजी दोन ट्रकमधून राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथील सुमारे शंभर महिला, पुरूष व छोटी मुले इचलकरंजीहून राजस्थानकडे जाण्यासाठी निघाले होते. दुपारी दोन वाजे दरम्यान ते नगर-मनमाड राज्य महामार्गावर राहुरी तालुक्यातील गुहा येथे पाणी पिण्यासाठी थांबले होते. यावेळी देवळाली प्रवरा येथील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना लाठी काठ्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत अनेकजण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिस फौजदार घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांसमक्ष काही जणांना मारहाण करण्यात आली. मात्र पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. अद्याप मारहाण करणाºया लोकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. या उलट पर राज्यातील त्या लोकांना प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना घेऊन जात असलेले दोन माल वाहतूक ट्रक प्रशासनाने जप्त केले आहे. तसेच त्यांना होम क्वारंटाईनचे शिक्के मारून शहरातील गाडगे महाराज आश्रम शाळा येथे त्यांना ठेवण्यात आले आहे. आम्हाला जेवण देऊ नका. उपाशी ठेवा. पण आम्हाला आमच्या घरी जाण्यासाठी परवानगी द्या. अशी आर्त हात ते देत आहेत.
जेवण नको, उपाशी ठेवले तरी चालेल, फक्त आम्हाला गावी जाऊ द्या परप्रांतियांची हाक, राहुरीच्या आश्रमशाळेत शंभर परप्रांतियांची राहण्याची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 14:01 IST