शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी येथील साईबाबा संस्थांनवर राजकीय व्यक्तीची नियुक्ती नको : सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 15:01 IST

अहमदनगर : शिर्डी येथील साई संस्थानवर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीची नियुक्ती करू नये, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी केली आहे.  भोस यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून बिगर राजकीय व्यक्तींच्या काही नावांची यादीच दिली आहे. 

अहमदनगर : शिर्डी येथील साई संस्थानवर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीची नियुक्ती करू नये, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी केली आहे.  भोस यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून बिगर राजकीय व्यक्तींच्या काही नावांची यादीच दिली आहे. 

भोस यांनी निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी (साईबाबा) संस्थानच्या अध्यक्षपदी अनेक वेळा राजकीय व्यक्तींची नेमणूक झाली आहे. त्यात अनेक गैरप्रकार व आर्थिक भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आल्याने या संस्थानची बदनामी झाली आहे. शिर्डी हे देशभरातील सर्व धर्मियांचे श्रद्धा स्थान असून, करोडो साईभक्त दरवर्षी नित्यनियमाने दर्शनासाठी येतात व भक्ती भावाने अब्जावधी रूपयांचे मनोभावे दान  करतात. मात्र त्याचा योग्य विनियोग न झाल्याने शिर्डी येथे पाहिजे त्या सोई सुविधा आजही निर्माण झाल्या नाहीत. 

शिर्डी संस्थान हा राजकीय पुढाऱ्यांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे अनेक निविदा प्रक्रियेत करोडो भ्रष्टाचार झाला आहे. जगभरात पसरलेल्या साईबाबा भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शिर्डी संस्थानवर कोणत्याही राजकीय व्यक्तीची नेमणूक न होता, सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती करावी.

नगर जिल्ह्यातील भ्रष्ट राजकीय पुढाऱ्यांचा पुनर्वसन व आर्थिक संधी देण्यासाठी या संस्थानचा अनेक वेळा गैरवापर झाला आहे. मद्य निर्माण करणारे भ्रष्ट कारखानदार यांना या संस्थानवर संधी देऊन साईबाबा यांच्या विचारांची प्रतारणा करू नये.  प्रस्थापित, साखर सम्राट, मद्य सम्राट यांच्या नियुक्त्या होऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनीही संस्थानवर बिगर राजकीय व्यक्तीची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. ----या आहेत बिगर राजकीय व्यक्ती

धार्मिक क्षेत्रात काम करणारे-बद्रीनाथ महाराज तनपुरे, निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर), सामाजिक क्षेत्रात काम करणारे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, कायदे तज्ञ  असीम सरोदे, शिक्षण तज्ज्ञ  हेरंब कुलकर्णी, शेतकरी नेते अजित नवले,  राजू देसले, अशोक सब्बन यांच्या नावाचा विचार व्हावा.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSaibaba Mandirसाईबाबा मंदिर