शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बिबटयाच्या हल्ल्यात नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 12:46 IST

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) तालुक्यातील  कुरणपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.

श्रीरामपूर - श्रीरामपूर (जि. अहमदनगर) तालुक्यातील  कुरणपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली. दर्शन चंद्रकांत देठे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

दर्शन देठे हा जवळच वस्तीवर असलेल्या गणपतीच्या आरतीसाठी गेला होता. आरती झाल्यानंतर रात्री तो घरी परतत होता. रात्री शेतातून बिबट्या अचानक बाहेर आला आणि कोणाला काही कळण्याच्या आतच बिबट्याने दर्शनवर हल्ला केला. त्याला पाचशे-सहाशे फूट ओढत नेले. अश्विनी देठे हिने आरडाओरड केली. त्यानंतर बिबट्याने दर्शनला ऊसात तसेच सोडले. जमलेल्या नागरिकांनी दर्शनला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

कोल्हार येथून फत्त्याबादकडे येत असताना उदयन बाबासाहेब आठरे  (वय २४) आणि ब्रजेश दिलीप आठरे (वय१३)  यांना  कोल्हार-बेलापूर रोडवर बिबट्या आडवा गेला. त्यामुळे या पळापळीत दोघेही जखमी झाले. दोघांनाही प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बेलापूर-कोल्हार रोडवरील ताके वस्तीनजीक बुधवारी सायंकाळी पाच बिबट्यांचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून श्रीरामपूर तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे.मात्र त्याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. या निषेधार्थ आज कुरणपूरचे ग्रामस्थ रास्तारोको करत आहेत. 

टॅग्स :leopardबिबट्याAhmednagarअहमदनगरDeathमृत्यू