शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडे धरण भरले ५० टक्के, भंडारदरा ३४ टक्के भरले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 11:13 IST

राजूर : भंडारदरा,मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रा बरोबर कळसुबाई शिखर परिसरात पावसाचे सातत्य टिकून आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी निळवंडे धरण निम्मे (५० टक्के) भरले तर भंडारदरा धरण ३४ टक्के भरले.

राजूर : भंडारदरा,मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रा बरोबर कळसुबाई शिखर परिसरात पावसाचे सातत्य टिकून आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी निळवंडे धरण निम्मे (५० टक्के) भरले तर भंडारदरा धरण ३४ टक्के भरले.

    मागील वर्षी नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे सर्वच धरणे काठोकाठ भरली होती. त्यातच दोन्ही धरणांच्या लाभक्षेत्रात पाण्याची मागणीही काही प्रमाणात कमी होती. त्यामुळे या वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणांमध्ये मुबलक पाणी साठा शिल्लक होता.निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले अखेरचे आवर्तन २२ जून रोजी बंद झाले. त्यावेळी या धरणातील पाणीसाठा ३ हजार ५०१ दशलक्ष घनफुट इतका होता.    या वर्षी भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रा बरोबर लाभ क्षेत्रातही पावसाचे आगमन लवकर झाले. काही दिवसांच्या विश्रांती नंतर पावसाचे सातत्य टिकून असल्याने भंडारदरा आणि निळवंडे धरणांत नवीन पाण्याची आवकही सुरु झाली. कळसुबाई शिखराच्या पर्वत रांगांतही पावसाचे सातत्य टिकून असल्याने प्रवरेची उपनदी म्हणून समजली जाणारी कृष्णावंती प्रवाही झाली आणि याच उपनदीवर वाकी येथे बांधण्यात आलेला ११२ दशलक्ष घनफुट क्षमतेचा पाझर तलाव मंगळवारी सकाळी भरून वाहू लागला. या तलावावरून २५६ कुसेक्सने पाणी नदी पात्रात झेपावत होते.या पाण्याबरोबर भंडारदरा धरणाच्या खालील परिसरातील सर्व पाणी निळवंडे जलाशयात येत असते.गुरुवारी सकाळी निळवंडे धरणात ४५ दशलक्ष घनफुट पाणी नव्याने आले आणि ८ हजार ३२० दशलक्ष घनफुट क्षमतेच्या निळवंडे धरणातील पाणीसाठा ५० टक्के झाला. गुरुवारी सकाळी सहा वाजता यातील पाणीसाठा ४ हजार १६४ दशलक्ष घनफुट इतका झाला होता.

    दरम्यान भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी अंतरा अंतराने पडत असल्याने ओढे नाले प्रवाही झाले आहेत.त्यामुळे गुरुवारी सकाळी या धरणात २२३ दशलक्ष घनफुट नवीन पाण्याची आवक होत धरणातील पाणीसाठा ३ हजार ७६० दशलक्ष घनफुट झाला आणि धरणातील एकूण पाणीसाठा ३४ टक्क्यांहून अधिक झाला.

    गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत नोंदला गेलेला पाऊस मिलिमीटर मध्ये पुढील प्रमाणे,कंसात या मोसमात पडलेला पाऊस:-रतनवाडी57(९५७),  घाटघर ६७(१३२२), पांजरे ५२(८५३) ,भंडारदरा ४५(६९७), वाकी ४०(५४८), निळवंडे ५(४१७)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरण