पारनेर : आमदार नीलेश लंके यांची माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार संघटनेच्या राज्य समितीवर निवड झाली आहे. राज्य शासनाच्या वतीने सोमवारी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार यांनी राजपत्र जाहीर केले. राज्यातील प्रमुख आठ आमदारांसह औद्योगिक व कामगार संघटनेच्या प्रतिनिधींचा यामध्ये समावेश आहे.
माथाडी हमाल व श्रमजीवी कामगारांचे प्रश्न व समस्या सोडविण्याचे काम ही समिती करते. राज्य विधानमंडळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांमध्ये आमदार भरत गोगावले, आमदार महेश शिंदे, आमदार अशोक ऊर्फ भाई जगताप, आमदार शशिकांत शिंदे, आमदार नीलेश लंके, आमदार संजय जगताप, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार सरोज अहिरे यांची राज्यातून निवड करण्यात आली आहे.
कंपनी मालकांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य : प्रशांत गिरबने (एमसीसीआय, पुणे), शिवनारायण सोमानी (नाशिक), रामचंद्र भोगले (औरंगाबाद), निरंजनलाल गुप्ता (बीजीटीए, मुंबई), अमृतलाल जैन (ग्रोमा, मुंबई ), संजय अग्रवाल (नागपूर), सुदेश शेष्टी (मुंबई), दत्तात्रय ढमाळ (सातारा). कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य असे : डॉ. बाबा आढाव, नरेंद्र पाटील, गुलाबराव जगताप, दिलीप जगताप, राजकुमार घायाळ, इरफान सय्यद, संतोष शिंदे, सुभाष लोमटे.
-----
कामगारांना न्याय देणार - लंके
उद्योग-व्यवसाय जगतात अनेक कामगार काम करतात. या कामगारांच्या अनेक समस्या आहेत. अनेक ठिकाणी कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवर वेळोवेळी अन्याय होताना दिसतो. त्यामुळे राज्य सरकारच्या माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार संघटनेच्या राज्य समितीच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न, समस्या सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केली.
---
स्कॅन फोटो : नीलेश लंके