श्रीगोंदा : नगर-सोलापूर महामार्गावर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अंकीता प्रशांत वाल्हेकर (वय २२, रा. थिटे सांगवी) ही नवविवाहिता जागीच ठार झाली. हा अपघात बनपिंपरी शिवारात गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला.
प्रशांत वालेकर यांच्या मोटारसायकलला समोरच्या मोटारसायकलने चुकीच्या बाजूने येऊन धडक दिली. या अपघातात प्रशांत वाल्हेकर हेही जखमी झाले आहेत.
अंकिता व प्रशांत यांचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. या घटनेने थिटे सांगवी व रुईखेल परिसरात शोककळा पसरली आहे.