शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या शेतात आढळले नवजात अर्भक; स्नेहालयाकडे बाळ सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 15:44 IST

शेवगाव तालुक्यातील ढोरसडे गावाच्या शिवारात कांद्याच्या शेतात स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

शेवगाव : तालुक्यातील ढोरसडे गावाच्या शिवारात कांद्याच्या शेतात स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही बाब शेतात काम करणा-या मजुरांच्या लक्षात आली. त्यानंतर तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले.ढोरसडे येथील शेतकरी बाबासाहेब खंबरे यांच्या शेतात कांदा लागवड केलेल्या क्षेत्रात अज्ञात व्यक्तीने स्त्री जातीचे नवजात अर्भक एका झाडाच्या बाजूला ओलसर जमीन थोडी उकरुन त्यात ठेवले होते. सकाळी अकराच्या सुमारास बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने ही बाब शेतात काम करणा-या लोकांच्या लक्षात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामराव ढिकले हे कर्मचा-यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. ढिकले यांनी दहिगावने येथील प्राथमिक आरोग्य विभागाला संपर्क साधून डॉक्टरांना पाचारण केले. डॉ. कैलास कानडे यांनी त्या नवजात बालकाची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी बालकाला पाठवण्यात आले आहे. दरम्यान ढिकले यांनी अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेला संपर्क साधून त्या बाळाचे संगोपन करण्याबाबत विनंती केली आहे. सायंकाळपर्यंत स्नेहालयाचे कर्मचारी बालकाला स्वीकारणार आहेत. सदर घटनेची माहिती परिसरात वा-यासारखी पसरली. अनेकांनी धाव घेऊन घटनास्थळ गाठले. यावेळी उपस्थितांनी मन हेलावणारी घटना पाहून हळहळ व्यक्त केली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ए. एस. आय गिरी करीत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावCrime Newsगुन्हेगारी