शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदासाठी वर्पे, ढाकणे, कोठारी, झावरेंची फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 10:00 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्याने निवड होत असलेल्या जिल्हाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. 

अहमदनगर: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्याने निवड होत असलेल्या जिल्हाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी कोपरगावचे संदीप वर्पे, पाथर्डीचे प्रताप ढाकणे, जामखेडचे राजेंद्र कोठारी, कर्जतचे राजेंद्र फाळके आणि पारनेरचे युवा नेते सुजित झावरे यांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली आहे़ त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आहे.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येत्या बुधवारी मुंबईत नगर जिल्हाध्यक्ष निवडीबाबत बैठक होत आहे. अहमदनगर जिल्हा वगळता अन्य काही जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्षांना पक्षाने मुदतवाढ दिली आहे. तशी घोषणाही मध्यंतरी मुंबईतून करण्यात आली आहे. त्यामध्ये नगरचा समावेश नव्हता़ तेव्हाच नगरच्या जिल्हाध्यक्ष बदलाचे संकेत मिळाले होते़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सध्या शेवगाव- पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्याकडे आहे. पण, घुले विधानसभा निवडणुकीचे उमेदवार असणार आहेत.  आगामी निवडणुकीतील संभाव्य उमेदवारांना पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी पुढे आली होती.  पक्षश्रेष्ठींनी त्यास संमती दिली़ या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या नवीन जिल्हाध्यक्षपदासाठी चाचपणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातून पाच जणांनी पक्षाकडे मागणी केली आहे़ त्यांना मुंबईच्या बैठकीसाठी हजर राहण्याचे निरोपही पक्षाने धाडले असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात भाजपाने शिरकाव केला आहे. जिल्ह्यात लोकसभेचे दोन, तर विधानसभेचे बारा मतदारसंघ आहेत.  लोकसभेच्या मागील निवडणुकीत भाजप-शिवसेनेने बाजी मारली. विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला.  राष्ट्रवादीला तीन जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीने सेना-भाजपाला धूळ चारली़ जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत घुले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली़ भाजपाने सत्तेच्या बळावर सहकारी संस्थांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला़ मात्र घुले यांनी त्याचा मुकाबला केला़ आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घुले मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. त्यात त्यांचा शेवगाव-पाथर्डी मतदारसंघ सध्या भाजपाच्या ताब्यात आहे. या मतदारसंघातून विजयश्री खेचून आणण्याचे मोठे आव्हान घुले यांच्यासमोर आहे़ त्यामुळेच घुले यांना मतदारसंघात वेळ देता यावा, यासाठी पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त केले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दक्षिणेतून सर्वाधिक इच्छुकजिल्हाध्यक्षपदासाठी उत्तरेतून एकमेव अर्ज प्राप्त झाला असून, दक्षिणेतून ढाकणे, कोठारी, फाळके आणि झावरेंचा अर्ज आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस