शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावच्या रस्त्यांसाठी राष्ट्रवादीने घातला बल्लाळेश्वराला अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 12:58 IST

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व रस्ते खड्डेमुक्त केल्याचा दावा केला असला तरी कोपरगावातील अनेक रस्ते खड्डेयुक्त असल्यामुळे हे रस्ते दुरुस्त करावेत, यासाठी शुक्रवारी राष्ट्रवादीच्यावतीने बल्लाळेश्वराला मंदिरात अभिषेक व सत्यनारायण महापूजा घातली.

कोपरगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व रस्ते खड्डेमुक्त केल्याचा दावा केला असला तरी कोपरगावातील अनेक रस्ते खड्डेयुक्त असल्यामुळे हे रस्ते दुरुस्त करावेत, यासाठी शुक्रवारी राष्ट्रवादीच्यावतीने बल्लाळेश्वराला मंदिरात अभिषेक व सत्यनारायण महापूजा घातली.कोपरगावच्या रस्त्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे़ १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा पाटील यांनी केली होती. त्यामुळे कोपरगावातील रस्तेही चकाचक होतील, अशी अपेक्षा कोपरगावकरांना होती. मात्र, शहरासह तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न सुटू शकलेला नाही. कोपरगावातील रस्ते नगरपालिका प्रशासनाच्या हद्दीत येतात. त्यामुळे हे रस्ते नगरपालिकेने तात्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीच्यावतीने केली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांनी गांधीनगरमधील बल्लाळेश्वर मंदिरासमोर अभिषेक व सत्यानारायण महापूजा घालून नगरपालिका पदाधिकारी व प्रशासनाला सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली. यावेळी नगरसेविका वर्षा गंगुले, प्रतिभा शिलेदार, गटनेते विरेन बोरावके, नगरसेवक संदीप वर्पे, मंदार पहाडे, संदीप पगारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नंदू डांगे आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव