शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने नगरमधील दिल्लीगेट येथे तळले पकोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 19:02 IST

बेरोजगार तरुणांनी नोक-या मिळत नसतील तर पकोडे विकावे, असे वक्तव्य भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने नगरमधील दिल्लीगेट येथे पकोडे तळून भाजपाचा निषेध केला.

अहमदनगर : बेरोजगार तरुणांनी नोक-या मिळत नसतील तर पकोडे विकावे, असे वक्तव्य भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने नगरमधील दिल्लीगेट येथे पकोडे तळून भाजपाचा निषेध केला.देशातील तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडेतीन वर्षात तरुणांना नोक-या दिल्या नाहीत. पण बेरोजगार तरुणांचा अपमान केला जात आहे. अमित शाह यांनी एका कार्यक्रमात नोक-या मिळत नसतील तर बेरोजगार तरुण पकोडे विकू शकतात, असे वक्तव्य केले होते. हा तरुणांचा अपमान आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे यांनी केली. या निषेध आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, युवकचे अध्यक्ष अभिजीत खोसे, सरचिटणीस प्रा. सीताराम काकडे, शारदा लगड, राजश्री मांढरे, सागर गुंजाळ, ऋषिकेश ताठे, मयूर चव्हाण, शुभम वाल्हेकर, रोहन शिरसाठ, विकास दिघे, इम्रान शेख, तन्वीर मन्यार, सनी साठे, पिंटू कोकणे, निर्मला जाधव, अरुणा बोरा, उषा मकासरे, अपूर्वा पालवे, रेखा भोईटे, लता गायकवाड, अलका पगारे, गायत्री ठोंबरे, भारती भोसले, गंगूबाई गवळी, वैशाली गुंड, दीपाली कन्होरे आदी उपस्थित होते.दिल्लीगेट येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिलांनी भजे तळून सरकारचा निषेध म्हणून लोकांना त्याचे वाटप केले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत महिलांनी सरकारी धोरणावर टीका केली.

या सरकारकडून वारंवार संविधानाचा अपमान केला जात आहे़ घोषणाबाजीशिवाय सरकार काहीही करीत नाही़ निवडणुकीच्या वेळी आणि नंतरही अनेकदा बेरोजगारांना रोजगार देण्याचे आमिष दाखविण्यात आले. मात्र, सरकारने हे आश्वासन कधीच पाळले नाही. त्याउलट बेरोजगारांचा अपमान करण्यात आला़ याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करीत आहोत.-प्रा. माणिक विधाते, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस