शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

राष्ट्रवादीने चांगल्या संस्था बंद पाडल्या

By admin | Updated: October 2, 2014 23:50 IST

राहाता : राज्यात विविध पातळीवर काम करताना, कायम जनतेचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे पारदर्शक कारभार करता आला. राज्य भ्रष्टाचारमुक्त करणाऱ्यांनी किती भ्रष्टाचार केला हे मी सांगण्याची गरज नाही,

राहाता : राज्यात विविध पातळीवर काम करताना, कायम जनतेचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे पारदर्शक कारभार करता आला. राज्य भ्रष्टाचारमुक्त करणाऱ्यांनी किती भ्रष्टाचार केला हे मी सांगण्याची गरज नाही, असे प्रतिपादन शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. चांगल्या संस्था बंद पाडण्याचे काम राष्ट्रवादीने केल्याचे त्यांनी सांगितले.शिर्डी मतदारसंघातील दाढ बुद्रुक येथे आयोजित केलेल्या विविध भागातील बैठकांमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी सभापती सुभाष गाडेकर, माजी उपसभापती प्रल्हाद बनसोडे, विखे पाटील कारखान्याचे संचालक देवीचंद तांबे, सरपंच रावसाहेब गाडेकर, उपसरपंच सुभाष तांबे, माजी सरपंच गोरक्षनाथ तांबे, श्रावण वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपासोबत आहे. मंत्री म्हणून काम करताना मोठा संघर्ष करावा लागला. राष्ट्रवादीने अनेक महत्त्वाचे खाते घेऊन त्यात भ्रष्टाचार केला. तसेच काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यासह आमदारांना त्रास देण्याची भूमिका घेतली. आज भ्रष्टाचार करणारेच स्वच्छ प्रशासनाची भाषा करतात. शिर्डी मतदारसंघ विकासकामामध्ये राज्यात पुढे आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी यासह वैयक्तिक लाभार्थींच्या योजना प्रभावीपणे राबविल्यामुळे मतदारसंघाची राज्यात चर्चा होते. आता हवा फक्त काँग्रेसचीच आहे, असा दावा विखे यांनी केला. मुळा-प्रवरा वीज संस्था बंद पाडण्याचे पाप कोणी केले, हे संस्थेच्या सभासदांसह मतदारांना चांगले माहीत आहे. चांगली संस्था बंद पाडण्यामध्ये विरोधकांचाही सहभाग मोठा होता. मुळा प्रवरेच्या कामगारांची चिंता तुम्ही करू नका, त्यासाठी मी समर्थ आहे. केवळ निवडणुकीच्या वेळी या कामगारांचा पुळका आपल्याला येतो. पाच वर्षे संस्था आणि कामगारांची आठवण आपल्याला झाली नाही का? प्रश्न कोणी सोडवला, हे कामगारांना माहीत असल्याने ते तुम्हाला थारा देणार नाहीत. सिंचन घोटाळा सर्वप्रथम आपण समोर आणला असे सांगतानाच आज जिल्ह्याचा पाणी प्रश्न ऐरणीवर आहे. याविषयी बोलण्याचे धाडस कुणीही केले नाही. गावतील विविध विकास कामावर भाष्य करत दाढ बु. व दाढ खु. या नवीन पुलामुळे माणसं जोडण्याचे काम आपण केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.राधाकृष्ण विखे पाटील यांनी गावोगावी कार्यकर्त्यांच्या बैठकांवरती भर दिल्याने मतदारांमध्ये नवचैतन्य असून, ही निवडणूक खऱ्या अर्थाने मतदारांची हातात घेतली आहे. काँग्रेस पक्षाने घेतलेल्या कल्याणकारी योजनांचा आढावा यानिमित्ताने घेत असल्यामुळे काँग्रेसच्या दृष्टीने हे मोठे फिलगुड मानले जाते. दाढ बुद्रुक येथे रावसाहेब रामभाऊ तांबे, संजय माकावणे, सावकार माकावणे आदींनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.जनहिताच्या अनेक योजना काँग्रेसने आणल्या आहेत. त्याचे श्रेय आता मोदी सरकार घेत आहे. सर्वसामान्यांना आधार फक्त काँग्रेसच देऊ शकते. आज स्वतंत्र लढत असल्यामुळे राज्यात काँग्रेसचेच सरकार येईल असा आशावादही विखे यांनी व्यक्त केला. यावेळी देवीचंद तांबे, श्रावण वाघमारे, अ‍ॅड. भानुदास तांबे आदींनी मनोगत व्यक्त केले.