शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

नवरात्र स्पेशल : महिलांना आर्थिक बळ देणारी ‘अंबिका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 11:54 IST

सहकाराचे उगमस्थान म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात महिलांनीही एक पाऊल पुढे टाकत ४ जानेवारी १९८८ रोजी दि.अंबिका महिला सहकारी बँकेची स्थापना केली.

अरूण वाघमोडेअहमदनगर: सहकाराचे उगमस्थान म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात महिलांनीही एक पाऊल पुढे टाकत ४ जानेवारी १९८८ रोजी दि.अंबिका महिला सहकारी बँकेची स्थापना केली. गेल्या ३१ वर्षात उत्कृष्ट ग्राहकसेवा, विश्वासार्हता, आणि पारदर्शी कारभाराच्या बळावर या बँकेने उत्तुंग भरारी घेत सर्वसामान्य महिलांचे आर्थिक केंद्रस्थान म्हणून लौकिक मिळविला आहे.  या यशाचे सर्व श्रेय बँकेच्या कारभारणींनाच जाते.या बँकेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आणि सभासद महिलाच आहेत. बँकेची ध्येयधोरणे महिलाच ठरवितात.उत्कृष्ट कामकाजासाठी या बँकेला आजपर्यंत विविध नामांकित संस्थांकडून १२ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.सहकार क्षेत्रात आघाडीवर असलेल्या नगर जिल्ह्यात महिलांसाठी स्वतंत्र बँक नव्हती. सहकारमहर्षी स्व. ह. कृ़ तथा बाळासाहेब काळे यांनी त्यांच्या सूनबाई प्रा़ मेधाताई काळे यांना महिलांसाठी बँक स्थापन करण्याची प्रेरणा दिली. मेधाताई यांनी सहकारी महिलांना ही संकल्पना सांगून थेट कामाला प्रारंभ केला. नगर शहराचे सर्वेक्षण करून रिझर्व्ह बँकेला प्रस्ताव सादर केला. रिझर्व्ह बँकेने बँक सुरू करण्यासाठी कमीतकमी ७०० सभासद आणि ३ लाखांचे भागभांडवल जमा करण्याची अट घातली. मेधाताई काळे आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी अवघ्या दीड महिन्यात २ हजार ९४ सभासदांची नोंदणी करून ३ लाख ७५ हजार रूपयांचे भागभांडवल जमा केले आणि नगर शहरात जिल्ह्यातील पहिली महिला सहकारी बँक अस्तित्वात आली. या बँकेच्या आज शहरात चार शाखा असून ५ हजार ८८५ महिला सभासद आहेत. बँकेचा एकूण ११५ कोटी रूपयांचा व्यवसाय आहे. आजपर्यंत ५ हजार १२० सभासदांना कर्जवाटप करण्यात आले आहे. आरबीआयचे प्रथम श्रेणीचे निकष पूर्ण करून बँकेचा कारभार चालतो. येणा-या काळात ग्राहकांना सर्व आधुनिक बँकिंग सेवा, एटीएमसेवेसह जिल्ह्यात बँकेचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे या बँकेच्या अध्यक्षा पुष्पलता वाघ यांनी सांगितले.

या आहेत बँकेच्या कारभारणीमेधा काळे (संस्थापक संचालिका), पुष्पलता वाघ (अध्यक्षा), सरोजिनी चव्हाण (उपाध्यक्षा), पुष्पा मरकड (संस्थापक संचालिका), संध्या जाधव (संस्थापक संचालिका), लता फिरोदिया (संस्थापक संचालिका) इतर संचालक सदस्यांमध्ये क्रांती अनभुले, आशा मिस्किन, सुमन गोसावी, शांता मोरे, शारदा लगड, शोभना चव्हाण, सविता गांगर्डे यांचा समावेश आहे.महिलांना उद्योग उभारणीला आधारअंबिका महिला बँकेच्या माध्यमातून महिलांना छोटे-मोठे उद्योग उभारणीसाठी कर्ज दिले जाते. बँकेच्या आर्थिक पाठबळामुळे नगर शहरातील शेकडो महिलांनी स्वत:चे व्यवसाय सुरू केले आहेत. महिला बचत गटाच्यावतीने तयार केलेल्या उत्पादनाचे प्रदर्शनही बँकेच्यावतीने भरविले जाते. या प्रदर्शनामुळे अनेक बचत गटांना आर्थिक आधार मिळाला आहे.

महिलांनी स्थापन केलेली अंबिका महिला बँक आज बँकिग क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असून, महिलांसाठी आर्थिक आधार ठरली आहे. उत्कृष्ट ग्राहकसेवा आणि पारदर्शी कारभार हेच ध्येय ठेवून गेली ३१ वर्षे महिलांनी जिद्द आणि सचोटीने कारभार केला आहे. बँकेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, संचालिका, कर्मचारी वर्ग, सभासद आणि ठेवीदार यांचे मोठे योगदान आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश गायकवाड यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे बँकेने गेल्या काही वर्षात नेत्रदीपक प्रगती केली आहे. महिलांचा आर्थिक विकास हेच या बँकेचे ध्येय आहे.- प्रा.मेधा काळे, संस्थापक संचालिका

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर