शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मंगलाष्टके सुरू असतानाच नवरदेवाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 13:39 IST

विवाहप्रसंगी मंगलाष्टके सुरू असतानाच नवरदेवाला हृदयविकाराचा त्रास झाला अन‌् त्यामध्येच त्याची प्राणज्योत मालवली. ही घटना रविवारी दुपारी कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे घडली.

 

कर्जत : विवाहप्रसंगी मंगलाष्टके सुरू असतानाच नवरदेवाला हृदयविकाराचा त्रास झाला अन‌् त्यामध्येच त्याची प्राणज्योत मालवली. ही घटना रविवारी दुपारी कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे घडली.

विवेक प्रकाश जगताप (रा. भूम, जि. उस्मानाबाद), असे मृत नवरदेवाचे नाव आहे. विवाह सोहळा चिलवडी येथील करमाळा रस्त्यालगत असलेल्या नागेश्वर मंदिरात होता. चिलवडी येथील रहिवासी दिलीप धोंडिराम राऊत यांच्या कन्येचा विवाह भूम तालुक्यातील विवेक प्रकाश जगताप यांच्याशी होता. रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मंगलाष्टके सुरू होती. चार मंगलाष्टके झाली होती. उपस्थितांनी वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. त्यानंतर शेवटचे पाचवे मंगलाष्टक सुरू होणार होते. इतक्यात नवरदेला चक्कर आली. वरबाप व संयोजक, वऱ्हाडी मंडळीची एकच धावपळ उडाली. मंडपात कोसळलेल्या वराला तत्काळ उचलून राशीन येथे एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणी केली. मात्र, येथे येण्यापूर्वीच नवरदेवाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्यांना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे शवविच्छेदन करण्यात आले.

   हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने विवेक जगताप यांचे निधन झाल्याचे तेथे स्पष्ट झाले. दरम्यान, या विवाहासाठी डीजे लावण्यात आल्याचे समजते. डीजेच्या गाण्यावर नवरदेवानेही काही काळ नृत्य केल्याची गावात चर्चा होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतDeathमृत्यू