शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

राष्ट्रीय स्पर्धेत नगरचा झेंडा

By admin | Updated: December 17, 2015 23:41 IST

अहमदनगर : उत्तरप्रदेशमधील लखनौ येथे झालेल्या ‘क्लासिकल व्हॉईस आॅफ इंडिया’ या राष्ट्रीय गायन स्पर्धेत नगरच्या अंजली अंगद गायकवाड हिने प्रथम क्रमांक पटकाविला़

अहमदनगर : उत्तरप्रदेशमधील लखनौ येथे झालेल्या ‘क्लासिकल व्हॉईस आॅफ इंडिया’ या राष्ट्रीय गायन स्पर्धेत नगरच्या अंजली अंगद गायकवाड हिने प्रथम क्रमांक पटकाविला़ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. लखनौ येथे दरवर्षी राष्ट्रीय गायन स्पर्धेचे आयोजन केले जाते. १० व ११ डिसेंबरला झालेल्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून तीन स्पर्धकांची निवड झाली होती. त्यामध्ये दहा वर्षाच्या अंजलीचा समावेश होता. तिने भुपाली रागातील ख्याल सादर केला. तबला व तानपुरा एवढ्याच साथसंगतीवर तिने गानकला सादर केली. संपूर्ण देशभरातून विविध राज्यातील २६ स्पर्धक निवडले होते. ९ ते १४ वर्षे वयोगटातील ज्युनिअर ग्रुपमध्ये अंजली ही सर्वांत लहान स्पर्धक होती. स्टेट बँक क्लासिकल व्हॉईस आॅफ महाराष्ट्रा हे १५ हजार रुपयांचे रोख पारितोषिकही अंजलीनेच पटकाविले होते. तिची मोठी बहीण नंदिनी हिला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकाचे विजेते अंजली (ज्युनिअर ग्रुप) व ओम बोंगाणे (मुंबई-सिनिअर ग्रुप) यांच्या गायनाने मुख्यमंत्रीही प्रभावीत झाले. दोन्ही भगिनींना अंगद गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल त्यांचे ज्येष्ठ संगीततज्ज्ञ डॉ. देविप्रसाद खरवंडीकर, डॉ. मधुसूदन बोपर्डीकर, रघुनाथ केसकर, ज्ञानेश्वर दुधाडे, पवन नाईक यांनी कौतुक केले.