शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

गांधींचा राष्टÑवादीला दे धक्का

By admin | Updated: March 18, 2024 16:08 IST

अहमदनगर : देशभरात उसळलेल्या मोदी लाटेवर स्वार होत खासदार दिलीप गांधी यांनी राष्टÑवादीच्या तगड्या आव्हानाला मोडून काढले.

अहमदनगर : देशभरात उसळलेल्या मोदी लाटेवर स्वार होत खासदार दिलीप गांधी यांनी राष्टÑवादीच्या तगड्या आव्हानाला मोडून काढले. सलग दुसर्‍यांदा आणि एकूण तिसर्‍यांदा लोकसभेत प्रवेश सुनिश्चित करणार्‍या गांधी यांनी प्रतिस्पर्धी राष्टÑवादीचे राजीव राजळे यांचा २ लाख ९ हजार १२२ हजार मतांनी केलेला पराभव आजवरचा त्यांचा सर्वात ठसठशीत विजय ठरला. निकालावरुन नगरची लढत ‘थेट’ ठरली. गांधी यांनी १० लाख ६० हजार ४३८ मतदानापैैकी ६ लाख ५ हजार १८५ मतदारांचा विश्वास जिंकला. त्यांच्या मतांची ही टक्केवारी ५७.६ टक्के! प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार राष्ट्रवादीचे राजीव राजळे यांनी ३ लाख ९६ हजार ६३ मतांपर्यंत म्हणजेच ३७.३४ टक्कांपर्यंत मजल मारता आली. झालेल्या मतदानापैैकी या दोघांच्या मतांची बेरीज १० लाख १ हजार २४८ होते. त्याची टक्केवारी ९६ ! त्यामुळे यापूर्वी दोन वेळा तिरंगी लढतीत मतांच्या फाटाफुटीचा फायदा घेत विजय मिळवणार्‍या गांधींनी पहिल्यांदा थेट निम्म्यांवर मते खेचत विजय अधिकच दिमाखदार केला. यानिमित्ताने राष्टÑवादी आघाडीने आखलेल्या सार्‍या मनसुब्यांवरही पाणी फेरले. एवढेच कशाला, गांधीच्या पराभवासाठी अप्रत्यक्ष काम करणार्‍या पक्षांतर्गत आणि मित्रपक्षातील विरोधकांवरही आज त्यांचा विजय ‘साजरा’ करण्याची वेळ आली आहे. राष्टÑवादीला ‘मोदी लाटे’ची जाणीव झाली होती. त्यामुळे प्रचारात त्यांनी सातत्याने मोदींवर टीका केली. गांधी दुबळे उमेदवार आहेत, असाही एक ‘अतीआत्मविश्वासी’ मतप्रवाह राष्टÑवादीत तयार झाला होता. अर्थात निवडणूकीपूर्वीची स्थिती त्याला कारणीभूत होती. (पान ४ वर) या कारणांमुळे मिळाला विजय यंदा मोदी लाट आपल्याला तारणार याची जाणीव दिलीप गांधींना आधीच झाली होती. त्यामुळे तिकीट जाहीर होण्याआधीच मोदी आर्मीच्या माध्यमातून वातावरण निर्मितीवर भर दिला. एकीकडे आघाडीने प्रचार सभा, रॅलींचा धडाका लावलेला असताना भाजपाने घरोघरी पोहचण्याची रणनिती आखली. विस्कटलेली यंत्रणा अखेरच्या टप्प्यात एक‘संघ’ झाली. ‘दिलीप गांधींना मतदान, नरेंद्र मोदी पंतप्रधान’ या घोषवाक्याचा परिणामकारक वापर केला. पक्षांतर्गत विरोधकांचे मन वळविण्यात यश आले आणि विरोधी आघाडीतील नाराजीचा फायदा घेतला.