कुकाणा : नांदूर शिकारी (ता. नेवासा) येथील भाऊसाहेब महाराज उभेदळ यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे जाणारा नांदूर शिकारी ते पंढरपूर महंत दुर्गाप्पा पायी दिंडी सोहळा यंदाही कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाही स्थगित करण्यात आला. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे बंधन पाळत प्रतीकात्मक दिंडी प्रस्थानचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शक भाऊसाहेब महाराज उभेदळ म्हणाले, यंदाही वारी चुकणार असून आपण आपल्या विठुरायाला केवळ पंढरीतच न बघता कोरोनाच्या काळात ज्यांनी अनेकांचे प्राण वाचून जनसेवा केली त्याच्यातच खऱ्या अर्थाने आपणास विठुरायाचे दर्शन झाले आहे. यावेळी सुरेश लिपणे, सुदाम लिपणे, अण्णासाहेब ठोंबळ, ज्ञानेश्वर खलाटे, गायक दिनकर महाराज शिंदे, मृदंग वादक तुषार महाराज गायकवाड, भगवान लिपणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल पंडित, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, बाजीराव शिरसाठ, प्रमोद लिपणे आदी उपस्थित होते.
नांदूर शिकारी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा यंदाही रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:18 IST