शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब

By admin | Updated: September 19, 2014 23:39 IST

अहमदनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष सभापतींच्या नावावर शनिवारी शिक्कामोर्तब होणार आहे़

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवड होत असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि समिती सभापतींच्या नावावर शनिवारी (दि़२०) शिक्का मोर्तब होणार आहे़ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र बैठक होवून आपल्या वाट्याला येणाऱ्या पदासाठी नावे निश्चित करण्यात येणार आहेत़ काँग्रेसची शनिवारी सायंकाळी सहा वाजता शहरातील तुषार गार्डन येथे बैठक होणार आहे़ पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत़ तर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक रात्री आठ वाजता हुंडेकरी लॉन येथे होत आहे़ या बैठकीला पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, शंकरराव कोल्हे, विद्यमान आमदारांसह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत़ दोन्ही काँग्रेसच्या बैठकांमध्ये सर्व सदस्यांशी चर्चा करून पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात येणार आहेत़ शालिनीताई विखे अध्यक्ष असताना जिल्हा परिषदेत पद वाटणीचा जो तोडगा निघाला होता तोच यावेळीही कायम करण्यात येणार असल्याचे समजते़ राष्ट्रवादीचे जास्त संख्याबळ असल्याने अध्यक्षपदासह बांधकाम व समाजकल्याण समिती त्यांच्याकडे राहिल तर काँग्रेसकडे उपाध्यक्षपदासह कृषी आणि महिला व बालकल्याण समिती राहणार आहे़ उद्या सायंकाळी दोन्ही काँग्रेसची स्वतंत्र बैठक झाल्यानंतर शनिवारी रात्री उशीरा किंवा रविवारी सकाळी मंत्री व ज्येष्ठ नेत्यांची पुन्हा बैठक होवून पदाधिकारी पदासाठी नावे निश्चित करण्यात येणार आहेत़ नंतर ही नावे मित्रपक्षांना कळविण्यात येणार आहेत़ शनिवारी होणाऱ्या बैठकीसाठी राष्टवादी काँग्रेसने सर्व सदस्यांना निमंत्रण दिले आहे़ मात्र, राष्ट्रवादीला रामराम करून भाजपावासी झालेले बबनराव पाचपुते यांच्या पत्नी जि़प़ सदस्या प्रतिभाताई पाचपुते या बैठकीला उपस्थित राहणार की, नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़ (प्रतिनिधी)