अहमदनगर : बोल्हेगाव येथील प्रभाग क्रमांक ७ मधील महापालिकेच्या आरोग्य केंद्राला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, यासह बोल्हेगाव फाटा ते जिल्हा परिषद शाळापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्ग’ असे नामकरण करावे, अशी मागणी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी निवेदनाद्वारे केली.
नगरसेवक वाकळे यांच्या नेतृत्वाखालील नागरिकांच्या शिष्टमंडळाने महापौर रोहिणी शेंडगे व आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी नगरसेवक राजेश कातोरे, रमेश वाकळे, सावळाराम कापडे, करण वाकळे, गौतम कापडे, गणेश वाकळे, राम काते, धनंजय सरोदे, प्रशांत बेलेकर, चिऊ औटी, मुन्ना शेख, बिपिन काटे, ज्ञानदेव कापडे, बाळासाहेब वाकळे, दत्तात्रय वाकळे, उत्तम वाकळे, नवनाथ कोलते, महेश वाकळे, राहुल कराळे, विष्णू कोलते, रावसाहेब वाटमोडे, भीमा वाकळे, सुरेश वाटमोडे, बाबा घोगरे, सुनील भालेराव, निवृत्ती उंडे, जीवन पगार, लातीब बेग, राजेंद्र मुंगसे, रमेश मुगसे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, बोल्हेगाव फाटा, गणेश चौक, शंभुराजे चौक ते जिल्हा परिषद शाळा हा प्रमुख रस्ता आहे. महासभेत छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, अशा नामकरणाबाबतचा विषय प्राधान्याने घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आंबेडकर चौक येथील आरोग्य केंद्राचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आरोग्य केंद्र’ असे नामकरण करावे, अशी मागणी या भागातील रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
...
मनपातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पाठपुरावा
नगरसेवक कुमार वाकळे यांनी मनपाच्या औरंगाबाद रोडवरील प्रशासकीय इमारतीसमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे महापुरुषांचे पुतळे बसविण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.
सूचना: फोटो ०१ वाकळे नावाने आहे.