शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगर मनपा निवडणूक : आजी-माजी आमदार खासदार दारोदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 11:38 IST

महापालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे़ प्रचारासाठी शेवटचे चार दिवस राहिल्याने खासदारासंह प्रमुख राजकीय पक्षांचे आजी-माजी आमदार दरोदारी फिरत आहेत़

अहमदनगर : महापालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे़ प्रचारासाठी शेवटचे चार दिवस राहिल्याने खासदारासंह प्रमुख राजकीय पक्षांचे आजी-माजी आमदार दरोदारी फिरत आहेत़ तुल्यबळ उमेदवार असलेल्या प्रभागांत ते अधिक वेळ देत आहेत़ तसेच महापौर पदाचे उमेदवार असलेल्यांना घरी बसविण्यासाठी राजकीय पक्षांनी यंत्रणा कामाला लावल्याने प्रचाराचा शेवटचा टप्पा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे़भाजपाने ठिकठिकाणी सभा घेऊन वातावरण निर्मिती केली़ सेनेने सोमवारपासून सभा घेण्यास सुरुवात केली आहे़ राष्ट्रवादीचा बैठका आणि वैयक्तिक गाठीभेटींवरच अधिक भर आहे़ राष्ट्रवादीची एकही चौकसभा अद्याप झालेली नाही़ शुक्रवारपर्यंत जाहीर प्रचार करता येईल़ त्यानंतर जाहीर प्रचार बंद होईल़ प्रचार शेवटच्या टप्प्यात असल्याने घड्याळाच्या काट्यावर प्रचार यंत्रणा राबत आहेत़ प्रचार फेऱ्या व सभामध्ये वेळ जातो़ त्यामुळे उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी खासदार, आमदार, माजी आमदार, यांचा भर आहे़ भाजपाच्या प्रचार यंत्रणेचे खासदार दिलीप गांधी व आमदार शिवाजीराव कर्डिले, हे दोघे प्रमुख आहेत़ निवडणुका जिंकण्यात आ़ कर्डिले माहिर असल्याने त्यांच्याकडे पक्षाने केडगावसह काही प्रभागांची जबाबदारी सोपविली आहे़ आ़ अरुण जगताप, आ़ संग्राम जगताप आणि माजी आमदार दादा कळमकर यांच्यासह पदाधिकारी प्रचारात उतरलेले आहेत़ माजी आमदार अनिल राठोड ठिकठिकाणी फिरत आहेत़अनेक प्रभागात राष्ट्रवादी, भाजप आणि सेनेने विचारपूर्वक तुल्यबळ उमेदवार दिले आहेत़ त्यामुळे उमेदवारांचा कस लागणार आहे, अशा ठिकाणी खासदार, आमदारांनी लक्ष केंद्रीत केले आहे़ आगामी लोकसभा, विधानसभा तोंडावर असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे़ दक्षिण लोकसभेचे सर्वाधिक मतदार नगर शहरात आहेत़यानिवडणुकीनंतर शहरात नंबर एक कोण ? ते स्पष्ट होईल़ इतर महापालिकांमध्ये भाजपाने कमळ फुलविले़ तसे इथेही कमळ फुलविण्यासाठी दस्तुर खुद्द मुख्यमंत्री या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत़

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका