शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

नगर मनपा निवडणूक २०१८ : छिंदमचा अर्ज स्वीकारणा-यां अधिका-यांना धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 10:29 IST

महापालिका निवडणुकीत माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा उमेदवारी अर्ज स्वीकारणा-या तसेच त्याच्या अर्जावर सूचक व अनुमोदक असणा-यांच्या तोंडाला काळे फासण्याची धमकी देणा-या तरूणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर : महापालिका निवडणुकीत माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा उमेदवारी अर्ज स्वीकारणा-या तसेच त्याच्या अर्जावर सूचक व अनुमोदक असणा-यांच्या तोंडाला काळे फासण्याची धमकी देणा-या तरूणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी महापालिकेतील प्रभारी सहाय्यक आयुक्त शहानवाज बु-हाण तडवी (वय ४३) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी भावेश अशोक राऊत (रा. लाटेगल्ली, अहमदनगर) व त्याच्या इतर साथीदारांवर सरकारी कामात अडथळा, कट रचणे, निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडणे, फौजदारीपात्र अतिक्रमण आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भावेश राऊत याची एक व्हिडिओ क्लिप शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. यामध्ये राऊत याने श्रीपाद छिंदम याचा अर्ज स्वीकारणा-या अधिका-याला तसेच त्याच्या अर्जावर सूचक व अनुमोदक असणा-यांना त्यांच्या कार्यालयात घुसून तोंडाला काळे फासण्याची धमकी दिली आहे. छिंदम याचा निवडणुकीसंदर्भात कुणी अर्ज स्वीकारू नये, असा या क्लिपमध्ये उल्लेख आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी धमकी देणारा राऊत व त्याच्या साथीदारांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची आदेश दिला. तडवी यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके व तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपतराव शिंदे यांनी राऊत याच्या शोधासाठी पथकांना रवाना केले आहे.पोलीस सतर्कछिंदम याने फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पोलिसांनी छिंदम याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला दोनवेळा शहरातून हद्दपार केले होता. छिंदम आता महापालिका निवडणुकीत उमेदवारी करत असल्याने पुन्हा काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत़ छिंदमच्या अनुषंगाने घडणा-या घडामोडींवर पोलिसांची बारिक नजर राहणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका