शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने निवडले चार 'आयाराम', इच्छुक जपताहेत राम नाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 20:22 IST

भाजपच्या सहा, बाहेरच्या पक्षातून आलेल्या चार विद्यमान नगरसेवकांसह १५ जणांची पहिली यादी भाजपने गुरुवारी सायंकाळी जाहीर केली.

अहमदनगर : भाजपच्या सहा, बाहेरच्या पक्षातून आलेल्या चार विद्यमान नगरसेवकांसह १५ जणांची पहिली यादी भाजपने गुरुवारी सायंकाळी जाहीर केली. सावेडीतील प्रभाग क्रमांक पाचमधील चारही उमेदवार जाहीर करण्यातआले असून अन्य प्रभागात एक किंवा दोन उमेदवार जाहीर झाल्याने इच्छुकांची धाकधूक वाढलीआहे.महापालिका निवडणुकीसाठी भाजपने दोन-तीन दिवसांपूर्वी २६७ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर कोअर कमिटीने इच्छुकांच्या यादीची छाननी करून ती प्रदेशकडे पाठविली. त्यानंतर ही यादी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या मान्यतेने कोअर कमिटीने जाहीर केली.गुरुवारी मुख्यमंत्री शनिशिंगणापूर दौऱ्यावर होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खा. दिलीप गांधी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.त्यानंतर दुपारी मनमाड रोडवरील पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयात तिघांसह प्रा. भानुदास बेरड, अ‍ॅड. अभय आगरकर, सुनील रामदासी, किशोर बोरा यांची बैठक झाली. त्यांच्या सहीने दुपारी साडेचार वाजता पहिली १५ जणांची यादी जाहीर करण्यात आली.यादीत एकूण दहा विद्यमान नगरसेवकभाजपचे महापालिकेत सध्या नऊ नगरसेवक आहेत. त्यातील दत्ता कावरे यांनी सेनेत प्रवेश केला, तर श्रीपाद छिंदम याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. राहिलेल्या सातपैकी सहा विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. नगरसेविका मनीषा काळे-बारस्कर यांच्या ऐवजी त्यांचे पती सी.ए. राजेंद्र काळे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. जाहीर नावांमध्ये सभापती बाबासाहेब वाकळे, महेश तवले, उषाताई नलवडे , मालन ढोणे, नंदा साठे, सुवेंद्र गांधी यांचा समावेश आहे. बाहेरच्या पक्षातून आलेल्या शारदा दिगंबर ढवण, मनोज दुलम, सुनीता भिंगारदिवे आणि किशोर डागवाले या चार नगरसेवकांचा समावेश आह१५ उमेद्वारांची यादीशारदा ढवण, अशोक कानडे (प्रभाग १), महेश तवले, उषाताई नलवडे (प्रभाग २), मनोज दुलम, सोनाबाई शिंदे, महेंद्र उर्फ भैय्या गंधे, आशा कराळे (प्रभाग ५), बाबासाहेब वाकळे (प्रभाग ६), सुनीता भिंगारदिवे (प्रभाग ७), मालन ढोणे (प्रभाग ९), नंदा साठे, सुवेंद्र गांधी (प्रभाग ११), शैलेश मुनोत (प्रभाग १२), किशोर डागवाले (प्रभाग १३)प्रभाग पाच आघाडीवरसावेडी भागातील प्रभाग क्रमांक पाच या एकमेव प्रभागात पूर्ण पॅनल जाहीर करण्यात आला आहे. या प्रभागात माजी नगरसेविका निलिमा बाळासाहेब गायकवाड व सोनाबाई तायगा शिंदे यांच्यात रस्सीखेच होती. त्यामध्ये शिंदे यांनी बाजी मारली आहे. प्रभाग १३ मध्ये एकमेव डागवाले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पुरुष-महिला गटात कोणी लढायचे? यावरून या प्रभागात संघर्ष निर्माण झाला आहे. अन्य प्रभागात केवळ एकच उमेदवार जाहीर झाल्याने अन्य उमेदवारांमध्ये एकमत झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच जाती समुहाच्या इच्छुकांची संख्या जास्त झाल्याने काही प्रभागात पेच निर्माण झाला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका