शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नगर मनपा निवडणूक २०१८ : शिवसेनेच्या पहिल्या यादीत जुनेच चेहरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 11:59 IST

अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये जुन्याच चेह-यांना संधी देण्यात आली आहे.

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये जुन्याच चेह-यांना संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये १९ जणांना शिवसेनेने संधी देण्यात आली आहे. शिवसेना उपनेते अनिल राठोड, नगर दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी यादी जाहीर केली.जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या दोेघांचा समावेश आहे. तसेच मनसेच्या एका नगरसेविकेचा समावेश आहे. विद्यमान महापौर सुरेखा कदम यांना प्रभाग क्रमांक १२ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय याच प्रभागातून राष्ट्रवादीमधून सेनेत दाखल झालेले चंद्रशेखर बोराटे, दत्तात्रय कावरे यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.प्रभाग क्रमांक १ मधून दीपाली नितीन बारस्कर, प्रभाग क्रमांक ४ मधून योगिराज शशिकांत गाडे, प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादीतून सेनेत प्रवेश केलेल्या कलावती शेळके, प्रभाग क्रमांक ७ मधून अशोक बडे व कमल सप्रे, प्रभाग क्रमांक ८ मधून रोहिणी शेडगे, पुष्पा अनिल बोरुडे, प्रभाग क्रमांक १३ मधून उमेश कवडे, सुभाष लोंढे, प्रभाग क्रमांक १४ मधून माजी महापौर भगवान फुलसौंदर, प्रभाग क्रमांक १५ मधून मनसेच्या सुवर्णा जाधव, विद्याताई खैरे, प्रभाग क्रमांक १६ व १७ मधून दिलीप सातपुते व मोहिनी लोंढे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.पहिल्या यादीमध्ये नवखा एकही उमेदवार नसल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.युतीच्या आशा मावळल्याशिवेसेनेने आघाडी घेत गुरुवारी पहिली यादी जाहीर केली. तर सोमवारी भाजपाकडून इच्छुकांच्या बैठकी घेण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्यात युती होण्याची आशा जवळपास मावळलेल्या दिसत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका