शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नगर मनपा निवडणूक २०१८ : राष्ट्रवादी अन शिवसेना कार्यकर्ते गॅसवर : आजी-माजी आमदार होणार हद्दपार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 10:21 IST

केडगावची तोडफोड अन् अधीक्षक कार्यालयातील हुल्लडबाजी कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही चांगलीच महागात पडली आहे.

अहमदनगर : केडगावची तोडफोड अन् अधीक्षक कार्यालयातील हुल्लडबाजी कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही चांगलीच महागात पडली आहे. याच गुन्ह्यातील सहभागाचा ठपका ठेवून पोलिसांनी आजी-माजी आमदारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांचा हद्दपारीचा प्रस्ताव प्रांत कार्यालयात पाठविला आहे.या प्रस्तावावर सुनावणी होऊन संबंधितांच्या हद्दपारीबाबत निर्णय होणार आहे. पोलिसांच्या या हद्दपारी शस्त्रामुळे नेत्यांसह कार्यकर्ते आणि महापालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवारही गॅसवर आहेत. पोलिसांनी प्रांत कार्यालयाकडे पाठविलेल्या प्रस्तावात २० नोव्हेंबर ते १० डिसेंबरपर्यंत शहरातून हद्दपार करावे अशी शिफारस केलेली आहे. त्यामुळे जे हद्दपार होतील त्यांना निवडणूक काळात शहरात थांबता येणार नाही. हद्दपारीत नाव असलेल्या १२० जणांना १४ नोव्हेंबर रोजी नोटीस पाठविण्यात आली होती. त्यांची शुक्रवारी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्यासमोर सुनावणी झाली.केडगाव येथे ७ एप्रिल रोजी दोघा शिवसैनिकांचे हत्याकांड झाले. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी घटनास्थळी तोडफोड केली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह ३०० जणांवर गुन्हा दाखल आहे. तसेच याच हत्याकांड प्रकरणाच्या अनुषंगाने ७ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात घुसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. याप्रकरणात आमदार अरूण जगताप यांच्यासह दोनशेपेक्षा जास्त जणांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हद्दपारीच्या प्रस्तावात जगताप, राठोड यांच्यासह तोडफोडीच्या गुन्ह्यातील बहुतांशी जणांचा समावेश आहे. केडगाव पोटनिवडणुकीतील वाद लक्षात घेत महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल असलेल्यांनाही शहरातून हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव सादर केले आहेत. आता पोलिसांनी दाखल केलेल्या प्रस्तावापैकी सुनावणीत किती जणांना शहरातून हद्दपार व्हावे लागणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.प्रस्तावातील नावेसुवेंद्र गांधी, विक्रम राठोड, श्रीपाद छिंदम, किशोर डागवले, गणेश भोसले, शिवाजी कदम, संभाजी कदम, नंदू बोराटे, दिलीप सातपुते, अशोक दहिफळे, बंटी सातपुते, अफजल शेख, हर्षवर्धन कोतकर, गजेंद्र दांगट, विकी जगताप, नरेंद्र कुलकर्णी, बाळासाहेब बोराटे, आसाराम कावरे, गणेश हुच्चे, अजय चितळे, सुनील कोतकर, बंटी राऊत, मयूर बोचूघोळ आदींचा समावेश आहे. उर्वरित नावांचे प्रस्ताव तयार असून, शनिवारी सकाळपर्यंत हे प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडे जाणार आहेत.पोलिसांनी तयार केलेल्या हद्दपारीच्या यादीत महापालिका निवडणुकीतील २० ते २२ इच्छुकांचा समावेश आहे. प्रांताधिकारी यांनी या इच्छुकांच्या हद्दपारीवर शिक्कामोर्तब केले तर त्यांना शहराबाहेर राहून निवडणूक लढवावी लागणार आहे.

पोलीस ठाणे निहाय प्रस्तावतोफखाना - २३१कोतवाली - २०९भिंगार - १०५एमआयडीसी- ८एकूण : ५५३

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका