शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नगर मनपा निवडणूक २०१८ : बोराटेंचा अर्ज बाद झाल्याने ‘रासप’ची आशा पल्लवीत, भाजप करणार पुरस्कृत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 12:47 IST

अहमदनगर : महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक- १२ ‘अ’ मधून शिवसेना व भाजपच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी ...

अहमदनगर : महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक- १२ ‘अ’ मधून शिवसेना व भाजपच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व रासपच्या उमेदवारात सरळसरळ लढत होणार आहे. निवडणुकीतील स्पर्धा कमी झाल्याने या प्रभागात रासपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.प्रभाग १२- अ मधून शिवसेनेकडून निवडणूक लढवित असलेले विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांच्या अर्जावर घुले यांनी आक्षेप घेतला. मालमत्ता कराची थकबाकी व मोबाईल टॉवरच्या कराची थकबाकीच्या मुद्यावर त्यांचा अर्ज बाद झाला. याच प्रभागातील भाजपाचे उमदेवार सुरेश खरपुडे यांच्यावरील मालमत्ता कराची थकबाकी व मंगल कार्यालयाचे अनाधिकृत बांधकाम केल्याचा आक्षेप घेण्यात आल्याने त्यांचाही अर्ज बाद झाला. या प्रभागात रिंगणात आता रासपचे हरिभाऊ डोळसे आणि राष्ट्रवादीचे संजय घुले यांच्यात लढत आहे. प्रथमच महापालिका निवडणुकीत सक्रिय झालेल्या रासपला या प्रभागाच्या माध्यमातून खाते खोलण्याची संधी आहे़ महापालिका निवडणुकीत रासपचे एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत. भाजपाने संपर्क केला तर रासपचा उमेदवार भाजपा पुरस्कृत असा पर्याय समोर असल्याचे रासपचे जिल्हाध्यक्ष रविंद्र कोठारी यांनी सांगितल़े़.सेना देणारा रासपला साथप्रभाग बारा -अ मधून उमेदवार बाद झाल्याने शिवसेना राष्ट्रीय समाज पक्षाला साथ देण्याच्या तयारीत आहे. सेनेच्या एका नेत्याने यासंदर्भात आमच्याशी संपर्क केला असल्याचे रासपच्या एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रभागात राजकीय पक्ष काय रणनिती ठरवणार हे शुक्रवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका