शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उसाला ३१०० रुपये भाव मिळावा, यासाठी राहुरीत नगर-मनमाड महामार्ग रोखला; शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 13:07 IST

शेवगाव तालुक्यातील ऊस दरावरुन पेटलेले आंदोलन ताजे असतानाच आता राहुरी तालुक्यातही उसाला ३१०० भाव मिळावा, यासाठी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील ऊस दरावरुन पेटलेले आंदोलन ताजे असतानाच आता राहुरी तालुक्यातही उसाला ३१०० भाव मिळावा, यासाठी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेतक-यांनी इतर वाहने सोडून फक्त उसाच्या ट्रक अडविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा सुमारे २०० उसाच्या ट्रक अडविण्यात आल्या आहेत.राहुरी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे़ या भागातून मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्यांना जातो़ मात्र, कारखान्यांकडून अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गुरुवारी सकाळी राहुरीजवळील गुहा येथे नगर-मनमाड महामार्गावर शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन सुरु केले. यात शेकडो शेतक-यांनी सहभाग घेत उसाच्या ट्रक अडविण्यास प्रारंभ केला. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे, सतिष पवार, दिनेश वराळे, अरुण डौले , प्रमोद पवार, दिनेश देठे, सुनिल इंगळे, सचिन पपवळे, आनंद वने, प्रविण पवार, विशाल तारडे, अच्युत बोरकर आदींनी सहभाग घेतला़ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.ऊस दराच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिका-यांशी सर्व कारखानादारांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देत वाघ यांनी रास्ता रोको मागे घेण्याची विनंती आंदोलकांना केली. मात्र, आंदोलक आंदोलनावर ठाम राहिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी