शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नगर-औरंगाबाद महामार्गावर एस.टी. बसच्या धडकेत दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 19:17 IST

रात्रीच्यावेळी महामार्ग ओलांडत असताना एस.टी.बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावरील बाभूळवेढा शिवारात घडली.

 

नेवासा : रात्रीच्यावेळी महामार्ग ओलांडत असताना एस.टी.बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावरील बाभूळवेढा शिवारात घडली. उल्हास कचरू इंगोले (वय ३५, रा.सोनखास.ता.मंगळूरपीर, जि.वाशीम) व परसराम तुकाराम काजळे, (वय ६१ रा.धनगरपुरा.ता.मंगळूरपीर, जि. वाशीम) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. एका खाजगी वाहनातून पुणे येथील भिडेवाड्यावरील मशाल मोर्चासाठी भीमराव मंडळीकर, भास्कर साहेबराव मुळे, संतोष दिनकरराव काळे, राहुल अंबादास राऊत, मंगल जयराम लबडे, वाहन चालक सुभाष दौलत चंदनशिवे, भिमराव उल्हास कचरू इंगोले,परसराम तुकाराम काजळे हे गेले होते. कार्यक्रमानंतर परतत असताना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास या सर्वांनी नगर-औरंगाबाद महामार्गावर बाभूळवेढा शिवारात हॉटेलमध्ये जेवण केले. जेवण झाल्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उल्हास कचरू इंगोले, परसराम तुकाराम काजळे हे दोघे लघुशंकेसाठी महामार्ग ओलांडून पलिकडच्या बाजूला जात होते. यावेळी नगरकडून औरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगात जाणाºया एस.टी.(एम.एच.२०, बी.एल.१७३७) बसने या दोघांना जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाले होते. भीमराव उमाजी मंडळीकर (रा.मंगळूरपीर) यांनी नेवासा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून एस.टी.बसचालक भाऊसाहेब संताराम थोरात याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण ठोंबरे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगर