शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात दगड घालून एक महिन्याच्या मुलाची हत्या;  मातेलाही पाजले विष; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 10:49 IST

पारनेर तालुक्यातील वाघुंडे बुद्रूक येथे बुधवारी (दि.१३) रात्री एक महिन्याच्या मुलाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. यावेळी आरोपींनी मयत बाळाच्या आईलाही विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला़ तिच्यावर सुपा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुपा : पारनेर तालुक्यातील वाघुंडे बुद्रूक येथे बुधवारी (दि.१३) रात्री एक महिन्याच्या मुलाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. यावेळी आरोपींनी मयत बाळाच्या आईलाही विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला़ तिच्यावर सुपा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सुपा पोलिसांनी दोघांना अटक केली.अर्णव अभिषेक चव्हाण (वय एक महिना), असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत उज्ज्वला अभिषेक चव्हाण (वय १९, रा. वाघुंडे बु.) यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात आदिक अजगण काळे, समीर आदिक काळे, किशोर मंत्री चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.बुधवारी रात्री दहा ते अकराच्या सुमारास वाघुंडे बुद्रूकशिवारातील उज्ज्वला चव्हाण यांच्या घरी हे आदिक काळे व समीर काळे आले होते. त्यांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने महिलेच्या तोंडात विषारी औषध टाकले. यावेळी आरोपींनी अर्णव चव्हाण या एक महिन्याच्या मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आदिक काळे, समीर काळे यांना अटक केली आहे. किशोर चव्हाण फरार आहे. उज्ज्वला चव्हाणवर सुपा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरCrime Newsगुन्हेगारी