शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

नगर मनपा निवडणूक : जवाब दो ! शाळा चांगली; पालिकेने वेशीला टांगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 15:52 IST

महानगरपालिकेच्या शहरातील ज्या काही उत्कृष्ट शाळा आहेत,

सोनल कोथिंबिरे / रोहिणी मेहेरेमहानगरपालिकेच्या शहरातील ज्या काही उत्कृष्ट शाळा आहेत, त्यामध्ये केडगाव येथील ओंकारनगरची प्राथमिक शाळा, लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय (रिमांड होम), रेल्वे स्टेशनजवळील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा यांचा समावेश होतो़ यातील ओंकारनगरच्या शाळेला आयएसओ मानांकन देऊन गौरविण्यात आले आहे़ या शाळांच्या समस्या मोठ्या नाहीत़ पण किरकोळ समस्यांकडेही पालिका लक्ष देत नाही़ रेल्वेस्टेशनच्या समोरच असलेल्या महापालिकेच्या शाळेला विद्युत पुरवठा व्हावा, तेथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा, ई-लर्निंगसाठी संगणक उपलब्ध व्हावेत, या शाळेच्या मागण्यांकडे पालिका दुर्लक्ष करीत आहेत़ महापालिकेच्या शिक्षण विभागाचे नाक समजल्या जाणाऱ्या शाळेकडेच होणारे दुर्लक्ष शिक्षकांसह नागरिकांनाही सहन होत नाही़ महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी या शाळेच्या मागण्यांबाबत कधी जागे होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़महापालिकेची ओंकारनगर येथील शाळा आदर्श समजली जाते़ या शाळेला १३ सप्टेंबर २०१८ रोजी आयएसओ मानांकन मिळाले आहे़ या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत़ त्यात एकूण ७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ शाळेतील मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, शिक्षक शिवराज वाघमारे, शिक्षिका वृषाली गावडे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी परिश्रम घेत आहेत़ शाळेत ई-लर्निंगपासून वेगवेगळे प्रयोग राबवित आहेत़ परिसरातील नागरिकही विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक साहित्य पुरवून शाळेच्या विकासाला हातभार लावीत आहेत़रेल्वे स्टेशनच्या समोरच डॉ़ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा आहे़ येथे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून, येथे २१३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ मुख्याध्यापक विजय घिगे, शिक्षक विठ्ठल आठरे, अनिल बडे, शिक्षिका मनिषा शिंदे, सुशीला घोलप, वर्षा लोंढे, भारती कवडे, अंजली साळुंके हे स्वखर्चातून शाळेसाठी शालेय साहित्य देतात़ शाळेची रंगरंगोटी करतात़ पण या शाळेतील विद्यार्थ्यांना मोकाट कुत्र्यांचा मोठा त्रास होतो़ शाळेच्या मैदानात पावसाळ्यात पाणी साचते़ हे पाणी गटारमध्ये काढून देण्याची मागणी आहे़ या शाळेतील तीन वर्गांमध्ये विद्युत पुरवठा होत नाही़ तसेच विद्यार्थ्यांना ई-लर्निंगसाठी संगणक मिळावेत, अशी या शाळेतील शिक्षकांची मागणी आहे़ १४ आॅगस्ट २०१८ रोजी महापालिकेला या शाळेने प्रस्ताव दिला आहे़ पण त्याबाबत अद्याप काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही़ त्यामुळे शिक्षकांनाही शिकविण्यात अडचणी येत आहेत़ रिमांडहोम येथील लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयात पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत़ या वर्गांमध्ये ९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ हे सर्व विद्यार्थी अनाथ असून, त्यांना पाच शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत़ मुख्याध्यापक शशिकांत वाघुलकर, शिक्षक अमोल बोठे, शिक्षिका ज्योती गहिले, मनिषा बारगळ, दीपाली शेवाळे हे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहेत़ येथील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत़‘लोकमत’चे आवाहन‘लोकमत’ने वेळोवेळी शहरातील समस्यांना वाचा फोडली. नागरिकांनीही महापालिकेकडे अनेक प्रश्न मांडले. सदर प्रश्नांच्या सोडवणुकीचे आश्वासन त्या-त्या वेळी महापालिकेचे पदाधिकारी आणि संबंधित नगरसेवकांनी दिले. या प्रश्नांचे खरोखरच काय झाले? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ‘जवाब दो’ या मोहिमेद्वारे ‘लोकमत’ या निवडणुकीत करत आहे. महापालिका शाळांच्या दुरावस्थेपासून त्यास सुरवात केली आहे. याबाबत सत्ताधारी पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी काही मत नोंदवू इच्छित असतील, तर त्यांच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.- संपादक

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका