शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नगर मनपा निवडणूक २०१८ : महापालिकेच्या मतदार यादीवर ‘हरकतींचा पाऊस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:49 IST

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे महापालिकेने तयार केलेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये अनेक मतदारांची अन्य प्रभागात पळवापळवी झाल्याचे उघड झाले आहे.

अहमदनगर : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे महापालिकेने तयार केलेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये अनेक मतदारांची अन्य प्रभागात पळवापळवी झाल्याचे उघड झाले आहे. मतदारांची नावे गायब होणे, मतदारांची नावे अन्य प्रभागात स्थलांतरित होणे अशा तक्रारींचे मोठे प्रमाण आहे. यावर इच्छुकांसह नागरिकांनी आक्षेप घेतले आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत तब्बल सातशे हरकती महापालिकेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे अधिकारी हैराण झाले आहेत, तर इच्छुकही घामाघूम झाले आहेत.महापालिकेची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुकांनी त्याचा दोन ते तीन दिवस अभ्यास केला. या यादीवर ३१ आॅक्टोबरपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर ६ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. मात्र मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ असल्याचे इच्छुकांच्या लक्षात आले. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी सलग दोन-तीन दिवस रात्रं-दिवस यादीचा अभ्यास केला. त्यामध्ये प्रभागात वास्तव्य असलेली नावेच गायब असल्याचे दिसले. अनेकांची नावे विधानसभा मतदार यादीत आहेत, मात्र कोणत्याही प्रभागांच्या यादीत नाहीत. एक ते दोन हजार मतदारांचे वास्तव्य एका प्रभागात आणि नावे मात्र दुसऱ्या प्रभागाच्या मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या चारही झोन कार्यालयांमध्ये तक्रारी, आक्षेप मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाले आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत तब्बल सातशे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.सोमवारी २१४ हरकती आल्या होत्या. मंगळवारी तब्बल पाचशेच्या वर हरकती स्वीकारण्यासाठी महापालिकेच्या अधिकाºयांची एकच धावपळ उडाली. दरम्यान केंद्रस्तरीय मतदार अधिकाºयांमुळे मतदार यादीमध्ये सावळा गोंधळ झाल्याची तक्रार सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे केली.चुकीच्या पद्धतीने मतदार यादी तयार झाल्याचा आक्षेप शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनीही घेतला आहे.महापौर सुरेखा कदम यांनीही त्यांच्या प्रभागातील नावे अन्य प्रभागात समाविष्ट झाल्याची हरकत घेतली आहे. त्यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक, इच्छुकांनी मंगळवारी हरकती दाखल करण्यासाठी महापालिका, झोन कार्यालयांमध्ये मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका