शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका : साडेसातशे कोटीचे अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 13:03 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि सत्ताधाऱ्यांची उदासीनता, यामुळे गेल्या पाच महिन्यापासून लालफितीत अडकलेले महापालिकेचे चालूवर्षाचे अंदाजपत्रक मंगळवारी सर्वसाधारण सभेत सादर करण्यात येणार आहे़

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि सत्ताधाऱ्यांची उदासीनता, यामुळे गेल्या पाच महिन्यापासून लालफितीत अडकलेले महापालिकेचे चालूवर्षाचे अंदाजपत्रक मंगळवारी सर्वसाधारण सभेत सादर करण्यात येणार आहे़ यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यास सात महिने राहिले असून, या सात महिन्यांत साडेसातशे कोटी खर्चाचे आव्हान पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे़महापालिकेचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक प्रशासनाने फेब्रुवारीमध्ये स्थायी समितीला सादर केले होते़ स्थायी समितीत अंदाजपत्रकावर चर्चा झाली़ सदस्यांनी शिफारशी सुचविल्या़ अंदाजपत्रक शिफारशींसह अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत सादर करणे बंधनकारक असते़ अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत सादर होण्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली़ त्यामुळे महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा होऊ शकली नाही़ लोकसभेची आचारसंहिता २७ मे रोजी संपुष्टात आली़आचारसंहिता संपल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्पीय सभा होईल, अशी आशा नगरसेवकांना होती़ मात्र सभा झाली नाही़ सभेसाठी महापौरांनी मंगळवारचा मुहूर्त काढला असून, या सभेत स्थायी समितीचे सभापती मुद्दसर शेख महापालिकेचे अंदाजपत्रक सादर करणार आहेत़ सत्ताधाºयांच्या काळातील ही पहिलीच अर्थसंकल्पीय सभा आहे़सेना-भाजपतील दुफळी कायमराष्ट्रवादीच्या मदतीने भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केली़ दरम्यानच्या काळात झालेल्या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपाचे शहरातील पदाधिकारी एका व्यासपीठावर आले़ परंतु, निवडणूक संपल्यानंतर सेना-भाजपात पुन्हा वाद उफाळून आला आहे़ महापालिका निवडणुकीनंतरची ही पहिलीच अर्थसंकल्पीय सभा आहे़ या सभेपूर्वी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांत समन्वय घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू होता़ परंतु, अद्याप समन्वय झालेला नाही़ अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर अभ्यासासाठी वेळ दिला जाणार आहे़ या काळात दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांची एकत्रित बैठक होईल, असा दावा सेना-भाजपाच्या नगरसेवकांकडून केला जात आहे़ परंतु, समन्वय बैठक न झाल्याने सभागृहात सेना आक्रमक पवित्रा घेईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका