शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यातील ३७ हजार कृषिपंपांची वीज महावितरणने तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 19:30 IST

वीजबिलाची थकबाकी न भरल्याने महावितरणने शेतकºयांच्या कृषिपंपांवर कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या २६ दिवसांत जिल्ह्यातील ३७ हजार शेतक-यांची वीज खंडित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरब्बी पिकांवर परिणाम २ हजार २५० कोटींची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : वीजबिलाची थकबाकी न भरल्याने महावितरणने शेतकºयांच्या कृषिपंपांवर कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या २६ दिवसांत जिल्ह्यातील ३७ हजार शेतक-यांची वीज खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होणार आहे. चालू बील भरून शेतक-यांनी कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील एकूण ३ लाख ५७ हजार शेतकºयांकडे २ हजार २८५ कोटींची थकबाकी आहे. त्यात मूळ थकबाकी १ हजार ३३८ कोटींची असून उर्वरित दंड व व्याज आहे. थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी राज्य सरकारने नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना आणली. या योजनेद्वारे शेतक-यांना त्यांच्या थकीत वीजबिलातील दंड व व्याज वगळून मूळ रकमेचे सुलभ हप्ते चालू बिलासह वर्षभरात भरण्याची सुविधा देण्यात आली. तसेच वीज बिलाबाबतच्या सर्वच शंकांचे निरसन करण्यासाठी डिसेंबर महिन्यात फिडरनिहाय कृषिपंप ग्राहकांच्या शिबिरांचेही नियोजन करण्यात आले होते.३१ नोव्हेंबरपर्यंत मुदत असलेल्या या योजनेत अहमदनगर जिल्ह्यातील ८८ हजार शेतक-यांनी सहभाग नोंदवला व चालू बिलाच्या रकमेपोटी ३५ कोटी १५ लाख रुपयांचा भरणा महावितरणकडे केला. परंतु अजूनही २ लाख ६९ हजार शेतक-यांकडे २ हजार २५० कोटींची थकबाकी आहे.या योजनेत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने १ डिसेंबरपासून महावितरणने थकबाकी वसुलीची मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तालुकानिहाय थकबाकी असलेल्या कृषिपंपाची वीज खंडित करण्यास प्रारंभ झाला असून २५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील ३७ हजार शेतक-यांवर कारवाई झाली आहे.चालू बील भरून कारवाई टाळाशेतक-यांंनी चालू बील किंवा ३ ते ५ हजार रूपये भरून कारवाई टाळावी. पैसेच भरले नाही तर वीज खंडित केल्याशिवाय पर्याय नाही. बिलाबाबत काही शंका, दुरूस्ती असेल तर स्थानिक उपकार्यालयात संपर्क करावा, तेथे कक्ष स्थापन केलेले आहेत. सर्व शंकांचे निरसन होईल. - अनिल बोरसे, अधीक्षक अभियंता, महावितरण 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी